Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
क्रीडा

IPL मध्ये आज दोन्ही अपराजित संघ भिडणार; कोणाचं पारडं जड?

IPL मध्ये आज दोन्ही अपराजित संघ भिडणार; कोणाचं पारडं जड?

RR vs RCB Match Today : IPL 2026 मधील 16वा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघ या हंगामात आतापर्यंत अपराजित आहेत. कोणता संघ आपली विजयी मालिका कायम ठेवतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार रियान पराग आहे तर बंगळुरुची कमान रज पाटीदारच्या खांद्यावर असेल. (RR vs RCB Match Today)

आरसीबीकडे संतुलित आघाडीची फळी :

यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांच्या आक्रमक सुरुवातीमुळं, राजस्थान रॉयल्स शुक्रवारी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) विरुद्धच्या आयपीएल सामन्यात आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर आरसीबीच्या आशा फॉर्मात असलेल्या देवदत्त पडिक्कलवर अवलंबून असतील. दोन वर्षांपूर्वी टी-20 क्रिकेटमधून निवृत्त होऊनही, आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या कामगिरीत कोणतीही घट झालेली नाही. त्याच्या मार्गदर्शनाखाली, आरसीबीनं एक संतुलित आघाडीची फळी तयार केली आहे आणि फिल सॉल्टनंही मागील सामन्यात एक उत्कृष्ट खेळी केली होती.

 

हेही वाचा : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊनं मारली बाजी; 21 वर्षीय खेळाडू ठरला विजयाचा नायक

 

राजस्थानचे आक्रमक सलामीवीर :

जैस्वाल आणि सूर्यवंशी यांच्यामुळं रॉयल्स या हंगामातील सर्वात आक्रमक फलंदाजी संघ म्हणून उदयास आला आहेत. या दोघांनी दमदार सुरुवात करुन दिली आहे आणि विरोधी गोलंदाजांवर दबाव टाकला आहे. मागील सामन्यात सूर्यवंशीनं जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारुन पुन्हा एकदा आपला निर्भय खेळ दाखवून दिला. रॉयल्सचे गोलंदाजही ही रणनीती यशस्वीपणे राबवण्यात यशस्वी ठरले आहेत.

दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा :

आयपीएलच्या इतिहासात, जेव्हा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील हेड टू हेड सामन्यांचा विचार केला जातो, तेव्हा आरसीबीचं पारडं थोडं जड आहे (head to head record RR vs RCB). इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात या दोन संघांमध्ये एकूण 34 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं 17, तर राजस्थान रॉयल्सनं 14 सामने जिंकले आहेत. याशिवाय, तीन सामने रद्द झाले आहेत. गेल्या आयपीएल हंगामात हे दोन संघ दोनदा आमनेसामने आले होते, ज्यात आरसीबीनं दोन्ही सामने जिंकले होते.

खेळपट्टीचा अहवाल काय :

गुवाहाटीची खेळपट्टी लाल मातीची असून साधारणपणे सपाट आहे, ज्यामुळं जास्त धावा होण्यास मदत होते. खेळपट्टीवर गवताचा पातळ थर आहे, त्यामुळं संध्याकाळच्या वेळी असलेल्या ओलाव्याचा वेगवान गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. दोन्ही संघांकडे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळं, जय-पराजयातील फरक गोलंदाजांवर अवलंबून असेल. सुरुवातीच्या षटकांनंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी होईल. रात्री मैदानावर दव पडल्याचा परिणाम दिसेल, ज्यामुळं धावांचा पाठलाग करणं सोपं होईल. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. (pitch report Guwahati)

सामन्यासाठी दोन्ही संघ :
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, लुआन ड्रे प्रिटोरियस, रवि सिंह, अमन पेराला, शिमरोन हेटमायेर, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, रविंद्र जडेजा, सॅम कुरन, एडम मिल्ने, बृजेश शर्मा, जोफ्रा आर्चर, कुलदीप सेन, क्वेना मफाका, नांद्रे बर्गर, रवि बिश्नोई आणि संदीप शर्मा.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेविड, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिलिप सॉल्ट, जितेश शर्मा, जेकब बेथेल, क्रुणाल पांड्या, रोमारियो शेफर्ड, जोश हेजलवुड, रसिख सलाम दार, भुवनेश्‍वर कुमार, सुयश शर्मा, स्वप्निल सिंह, यश दयाल, नुवान तुषारा, वेंकटेश अय्यर, जेकब डफी, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, अभिनंदन सिंह, विक्की ओस्टवाल, सात्विक देसवाल

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts