Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
ताज्या बातम्या

YOPD म्हणजे नेमकं काय? कोणाला धोका आणि सुरुवातीची लक्षणे कोणती?

YOPD

Young Onset Parkinson’s Disease: पार्किन्सन्स (Parkinson’s Disease) हा मेंदूशी संबंधित एक दीर्घकालीन आजार आहे, जो मुख्यतः शरीराच्या हालचालींवर परिणाम करतो, सामान्यतः हा आजार जास्त प्रमाणात वृद्धांमध्ये दिसतो, पण काही लोकांना तो कमी वयातही होऊ शकतो.

पार्किन्सन्स हा मेंदूशी संबंधित एक दीर्घकालीन आहार आहे, जो शरीराच्या हालचालींवर परिणाम करतो. सामान्यतः हा आजार वयस्कर लोकांमध्ये दिसतो, पण काही प्रकरणांमध्ये तो कमी वयातही होऊ शकतो. जेव्हा ५० वर्षीपूर्वी पार्किन्सन्सची लक्षणे दिसू लागतात, तेव्हा त्याला यंग- ऑनसेट पार्किन्सन्स (YOPD) म्हणतात. या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ११ एप्रिल रोजी World Parkinson’s Day साजरा केला जातो.

हेही वाचा: DA Hike बाबत सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; काय आहे प्रकरण आणि कोणाला होणार फायदा?

पार्किन्सन म्हणजे काय?

मेंदूतील काही स्नायू, जे हालचालींवर नियंत्रण ठेवणारे एक महत्त्वाचे रसायन, डोपामाइन तयार करतात, ते हळूहळू कमी होऊ लागतात. त्यामुळे शरीराचे संतुलन, वेग आणि नियंत्रण यावर परिणाम होतो.

सुरुवातीची लक्षणे कोणती?

पार्किन्सन्सची सुरुवात अतिशय हळू आणि सौम्य लक्षणांनी होते, त्यामुळे अनेकदा ती दुर्लक्षित केली जातात.

हात किंवा बोटांमध्ये हलका थरथर कापणे

स्नायूंमध्ये कडकपणा किंवा stiffness

हालचाली मंदावणे

शरीर जड किंवा थकलेले वाटणे

चालताना संतुलन कमी होणे

हातांची हालचाल कमी होणे

तसेच, काही लक्षणे थेट हालचालींशी संबंधित नसतात. जसे की, झोपेचा त्रास, बद्धकोष्ठता, वास ओळखण्याची क्षमता कमी होणे, सतत थकवा किंवा चिंता आणि नैराश्याची भावना दिसून येते.

यावर उपाय

नियमित व्यायाम आणि सक्रिय जीवनशैली
पोषक आणि संतुलित आहार
विषारी रसायनांपासून दूर राहणे
डोक्याला इजा होणार नाही याची काळजी घेणे

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts