Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • “मौलाना पवार, तुम्ही जाळीची टोपी परिधान इफ्तार पार्टीचे आयोजन करता”; तुषार भोसलेंची जहरी टीका
Top News

“मौलाना पवार, तुम्ही जाळीची टोपी परिधान इफ्तार पार्टीचे आयोजन करता”; तुषार भोसलेंची जहरी टीका

Controversy over Tushar Bhosale's remarks

Controversy over Tushar Bhosale’s remarks : शरद पवार (Sharad Pawar) यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. 60 लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना (Fanatical Forces) बळ देणारी असल्याचं मोठं वक्तव्य पवारांनी केलं. आता आम्ही अशा धर्मांध लोकांची, प्रतिगामी लोकांची यादी (List of Reactionaries) तयार करायला सुरुवात केल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आणि महाराष्ट्रात एकचं खळबळ उडाली. भाजपच्या (BJP) दीड दमडीच्या लोकांनी त्यांच्या या वक्तव्यावर जहरी टीका केली आहे.

हेही वाचा – ‘वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी’; पवारांच्या वक्तव्याने खळबळ

मुखी विठ्ठलाचं नाव आणि पंढरपूर भेटीची ओढ ही वारकऱ्याची खरी ओळख. पण मागच्या काही वर्षांपासून या वारकरी संप्रदायावरुन राजकारण सुरु झालं आहे. भोळाभाबडा भक्तीसंप्रदाय वारकऱ्यांमध्ये कट्टरता पसरवण्याचं काम काही वर्षांपासून सुरू असल्याचा आरोप पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते सातत्याने करत आहेत. तोच धागा पकडत शरद पवार यांनी वारकरी संप्रादायवर वक्तव्य केलं. मात्र, स्वतःला अध्यात्मिक समजणारे परंतू भाजपची चाकरी करणारे तुषार भोसली यांनी पवार यांच्या याच वक्तव्यावरून खालच्या पातळीवर टीका केली आहे.

वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोंडण्याचा पवार यांचा प्रयत्न

भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी शरद पवारांना चक्का मौलाना ठरवलं आहे. “शरद पवार यांना आता वारकरी संप्रदाय धर्मांध वाटतो. त्यांनी शरद पवार यांचा मौलाना” असा उल्लेख केला. “वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोंडण्याचा पवार यांचा प्रयत्न आहे” असा आरोप भोसले यांनी केलाय.

मौलना पवार तुम्ही त्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या झोडता

“अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या झोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही. पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजित समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागलाय. तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थान केली आणि आता 40-50 लोकांनी टोळी त्याच्यासाठी तयार केलीय. पण एक लक्षात ठेवा हा तुषार भोसले जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत तो तुमचं षडयंत्र शिजू देणार नाही” असं तुषार भोसले यांने म्हटलं आहे.

स्मरणिकेत महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न

दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे साहित्य संमेलन सुरू आहे. या साहित्या संमेलनात सौदामिनी नावाची स्मरणिका तयार करण्यात आली आहे. त्या स्मरणिकेत महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न अशा आशयाचा लेख शरद पवार यांनी लिहिला आहे. याच लेखात शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने भाष्य केलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts