Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • कॉक्रोच जनता पार्टीबाबत अण्णा हजारेंचा सरकारला सल्ला; म्हणाले की…
ताज्या बातम्या

कॉक्रोच जनता पार्टीबाबत अण्णा हजारेंचा सरकारला सल्ला; म्हणाले की…

Anna Hazare reacts to Cockroach Janata Party controversy: सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’बाबत अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला महत्वाचा सल्ला दिला आहे. पक्षाच्या नावापेक्षा त्यामागील युवकांचा पाठिंबा महत्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं.

सोशल मीडियावर (Social Media) अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची (Cockroach Janata Party) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय म्हणून समोर येण्याचा प्रयत्न करणाऱ्या या गटावर कारवाई करत त्यांची अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्स आणि संकेतस्थळ बंद करण्यात आले. मात्र, या कारवाईनंतरही पक्षाने माघार न घेता नव्याने उभं राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा: पेट्रोल- डिझेलपेक्षा इलेक्ट्रिक कार खरंच फायदेशीर? विक्रीच्या आकडेवारीतून समोर आले वास्तव

अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया

या घडामोडींवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया देताना युवकांच्या पाठिंब्याला महत्त्व दिलं. पक्षाचं नाव वादग्रस्त असलं तरी त्यामागील उद्देश आणि तरुणांचा सहभाग लक्षात घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. “युवकांची शक्ती ही देशाच्या भविष्यासाठी निर्णायक असते. सरकारने अशा नव्या विचारांकडे दुर्लक्ष न करता त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा,” असा सल्लाही त्यांनी दिला.

दरम्यान, राज्यातील लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीवरूनही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कायदा अस्तित्वात असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचं सांगत, गरज पडल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर मोठी कारवाई

कॉक्रोच जनता पार्टीच्या डिजिटल उपस्थितीवर सलग कारवाई करण्यात आली. सर्वप्रथम सोशल मीडिया अकाऊंट्स बंद करण्यात आली आणि त्यानंतर अधिकृत वेबसाईटही निष्क्रिय करण्यात आली. या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर लोकांचा प्रतिसाद मिळत होता.

संस्थापकांची तीव्र प्रतिक्रिया

पक्षाचे संस्थापक Abhijeet Dipke यांनी या कारवाईवर संताप व्यक्त केला. त्यांनी केंद्र सरकारवर आरोप करत म्हटलं की, वाढता जनसमर्थन पाहूनच ही कारवाई करण्यात आली. “आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय, पण आम्ही थांबणार नाही. आम्ही पुन्हा नव्या प्लॅटफॉर्मसह लोकांसमोर येऊ,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts