Whiteheads Problem Solution | आजकाल व्हाइटहेड्स (Whiteheads) ही एक सामान्य त्वचेची समस्या बनली आहे. बऱ्याच तरूणींना, तरूणांना व्हाइटहेड्सची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवताना दिसते. बदलती जीवनशैली, फास्टफूडचा आहारात मोठ्या प्रमाणात समावेश अशा अनेक कारणांमुळे त्वचेच्या समस्या जाणवताना दिसतात. ज्यामुळे चेहऱ्याची चमक कमी होते. व्हाइटहेड्स हे खरे तर मुरुमांचाच एक प्रकार आहेत. जेव्हा त्वचेवरील छिद्रे बंद होतात तेव्हा व्हाइटहेड्स येतात. बरेच लोक व्हाइटहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकल असलेल्या क्रिम लावून पाहतात. मात्र, त्यांना त्यामुळे हवा तसा रिझल्ट मिळत नाही. पण तुम्हाला माहित आहे का की काही असे घरगुती उपाय आहेत ज्याने तुम्हाला व्हाइटहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी मदत होते. चला तर मग आता आपण या घरगुती उपायांबाबत जाणून घेणार आहोत.
हेही वाचा – डार्क अंडरआर्म्समुळे लाज वाटते? टेन्शन घेऊ नका, ‘हे’ नैसर्गिक उपाय ठरतील प्रभावी
व्हाइटहेड्स घालवण्यासाठी घरगुती उपाय कोणते?
बेकिंग सोडा – बेकिंग सोडा हे एक नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे जे त्वचेवरील अशुद्धी स्वच्छ करते. बेकिंग सोडाचा उपयोग स्क्रब करण्यासाठी देखील केला जातो. तर तुम्हाला जर व्हाइटहेड्सचा प्रोब्लेम असेल तर त्यासाठी 1 चमचा बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट व्हाइटहेड्स असलेल्या भागावर 2 ते 3 मिनिटे लावा आणि नंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हे आठवड्यातून फक्त एकदाच करा यामुळे तुमची नक्कीच व्हाइटहेड्स पासून सुटका होईल.
टी ट्री ऑइल – टी ट्री ऑइल हे व्हाइटहेड्स साफ करण्यासाठी मदत करते. या ऑइलमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे मुरुम आणि व्हाईटहेड्स साफ करण्यास मदत करतात. यासाठी कापसाच्या बोळ्याने थोडेसे टी ट्री ऑइल थेट व्हाईटहेडवर लावा. तसेत जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर ते नारळाच्या तेलात मिसळा आणि लावा. यामुळे तुमचे व्हाइटहेड्स कमी होण्यास नक्की मदत होते.
ओट्स स्क्रब – ओट्समुळे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. तर ओट्सचा स्क्रब तयार करण्यासाठी, ओट्स जाडसर बारीक करून घ्या आणि त्यात दही मिसळून पेस्ट बनवा. हे मिश्रण चेहऱ्यावर 4 ते 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करा आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या त्वचेतील मृत पेशी सहज निघून जातात.
मध – मधात जीवाणूनाशक गुणधर्म असतात जे त्वचेला आर्द्रता देते. याचा वापर करण्यासाठी, थोडे मध कोमट करून व्हाइटहेड्स असलेल्या भागावर 15 मिनिटे लावा आणि नंतर धुवून टाका. यामुळे व्हाइटहेड्स कमी होतात आणि त्वचा मुलायम होण्यास मदत होते.










