• Home
  • लाईफस्टाईल
  • चेहऱ्यावरील काळे डाग घालवायचेत? ‘हे’ नैसर्गिक उपाय तुमची त्वचा करतील क्लिअर आणि ग्लोइंग
ताज्या बातम्या

चेहऱ्यावरील काळे डाग घालवायचेत? ‘हे’ नैसर्गिक उपाय तुमची त्वचा करतील क्लिअर आणि ग्लोइंग

dark spot

Dark Spot Removal Home Remedies | आजकाल प्रदूषण, ताणतणाव, चुकीची जीवनशैली आणि त्वचेची योग्य काळजी न घेतल्यामुळे चेहऱ्यावर काळे डाग (Dark Spoot) दिसू लागतात. हे डाग केवळ सौंदर्यावर परिणाम करत नाहीत, तर आत्मविश्वासही कमी करू शकतात. महागड्या क्रीम्स आणि ट्रीटमेंट्स वापरूनही अनेकांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. अशा वेळी काही सोपे, नैसर्गिक आणि घरच्या घरी करता येणारे उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात. नियमित वापराने हे उपाय त्वचा स्वच्छ, नितळ आणि नैसर्गिकरीत्या ग्लोइंग बनवण्यास मदत करतात. चला तर मग आपण आता काही प्रभावी घरगुती उपायांबाबत जाणून घेणार आहोत जे काळे डाग घालवण्यास मदत करतात.

हेही वाचा – चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी नैसर्गिक उपाय; घरच्या घरी करा ‘हा’ फेस पॅक

काळे डाग घालवण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय

कोरफड जेल – कोरफडीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात जे त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. याचा वापर करण्यासाठी, ताज्या कोरफडीच्या पानातून गर काढा आणि तो थेट काळ्या डागांवर लावा. नंतर 30 मिनिटांनंतर तुमचा चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून टाका. दिवसातून दोनदा कोरफडीचा गर काळ्या डागांवर लावा याचा तुम्हाला काही दिवसांतच परिणाम दिसून येईल. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग कमी होतील आणि चेहरा मुलायम होण्यास मदत होईल.

लिंबाचा रस – बऱ्याच तरूणींना पिंपल्स आल्यानंतर चेहऱ्यावर काळे डाग येतात. जर तुमच्याही चेहऱ्यावर पिंपल्समुळे काळे डाग आले असतील तर लिंबाच्या रसाचा वापर करा. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी आणि त्वचेचा रंग उजळवणारे गुणधर्म असतात, जे काळे डाग हलके करण्यास मदत करतात. कापसाच्या बोळ्याने डागांवर लिंबाचा रस लावा. 10-15 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर लिंबाचा रस मधात मिक्स करून तो काळ्या डागांवर लावा.

बटाट्याचा रस – बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात जे त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास मदत करतात. बटाटा किसून त्याचा रस काढा. तो चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या, त्यानंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरी काळे डाग कमी होण्यास मदत होते आणि तुमची त्वचा ग्लोइंग होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts