Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
क्रीडा

गिल-बटलरची दमदार खेळी; गुजरातचा लखनऊवर एकतर्फा विजय

163 धावा काढतांना गुजरातला नाकीनऊ, शेवटच्या षटकात मिळाला विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव

लखनऊ LSG Beat GT : इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 19वा साखळी सामना लखनऊ येथील इकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सनं 7 गडी राखून विजय मिळवला. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना, लखनऊ सुपर जायंट्सनं 20 षटकांत 8 गडी गमावून 164 धावा केल्या, हे लक्ष्य गुजरात टायटन्सनं 18.4 षटकांत आरामात पूर्ण केलं.

हेही वाचा : दिग्गज गायिका आशा भोसलेंचं क्रिकेटशी खास कनेक्शन; ‘या’ क्रिकेपटूसोबत गायलं होतं गाणं

लखनऊच्या एकाही फलंदाजाची मोठी खेळी नाही :

लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजी फळीतील एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. संघाकडून एडन मार्करामनं सर्वाधिक 30 धावा केल्या, तर ऋषभ पंत, अब्दुल समद आणि मुकुल चौधरी यांनी प्रत्येकी 18 धावा केल्या. गुजरात टायटन्सची गोलंदाजी प्रभावी ठरली, ज्यात प्रसिद्ध कृष्णानं सर्वाधिक 4 बळी, अशोक शर्मानं 2 तर कागिसो रबाडा व मोहम्मद सिराजनं प्रत्येकी 1 बळी घेतला.

गुजरातचा आरामात विजय :

लखनऊनं दिलेल्या 165 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातकडून शुभमन गिल आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी करुन धावांच्या पाठलागाला भक्कम सुरुवात करुन दिली. सुदर्शन 15 धावांवर बाद झाल्यानंतर, गिलसोबत जॉस बटलर सामील झाला, ज्यांनी दुसऱ्या विकेटसाठी 84 धावा जोडून सामन्याचं चित्र पूर्णपणे पालटून टाकलं. गिलनं 56, तर जॉस बटलरनं 60 धावा केल्या. लखनऊकडून मोहम्मद शमी, दिग्वेश राठी आणि प्रिन्स यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts