Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • जरांगे पुन्हा आक्रमक! मराठा उपसमितीवर टीका करत दिला आंदोलनाचा इशारा..
Top News

जरांगे पुन्हा आक्रमक! मराठा उपसमितीवर टीका करत दिला आंदोलनाचा इशारा..

Manoj Jarange Protest Maratha Reservation

Manoj Jarange Protest Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Aggressive) पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यानी सरकारसह मराठा समाजासाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीवर जोरदार हल्ला करत पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा (Warning of Agitation) दिला आहे. मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) घोषणा करताना सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन (Assurance to withdraw cases) दिले होते. मात्र, अद्याप गुन्हे मागं घेतले गेलेले नाहीत, यावरूनच मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे.

हेही वाचा – राजकीय हस्तक्षेपावरून नवा वाद; सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली तक्रार, नेमकं प्रकरण काय?

कसे गुन्हे मागे घेत नाहीत बघतो मी – जरांगे

‘सरकारने शब्द दिला होता की, सर्व गुन्हे मागे घेतले जातील. जोपर्यंत सर्व गुन्हे मागं घेतले जाणार नाही, तो पर्यंत मी शांत बसणार नाही. सरकारने तसा शब्द दिलेला आहे. नाहीतर सर्वात मोठं आंदोलन उभं करून सर्व गुन्हे मागे घेण्यास भाग पाडू, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. दाखल गुन्ह्यांपैकी 60-62 गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. त्याबाबत सरकारने अहवाल देऊन हे गुन्हे मागे घ्यायला हवेत. सरकार आणि फडणवीस जरी त्यांनी दिलेल्या शब्दापासून बदलले असले तरी त्यांना मी बदलू देणार नाही. कसे गुन्हे मागे घेत नाही मी बघतो, मी खंबीर आहे,’ असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिलाय.

उपसमितीच्या अध्यक्षाकडून अपमानास्पद वागणूक

‘जी उपसमिती मराठ्यांची स्थापन झालीये त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवं, त्यांनी दिखावा करण्यासाठी थातुर मातूर बैठका घेऊ नयेत. मराठा समाजाला उपसमितीच्या अध्यक्षाकडून अपमानास्पद वागणूक चालू आहे, ती थांबली पाहिजे. त्यांना समाज पाहिजे असंल तर, मराठा समाजाला न्याय मिळवून दिला पाहिजे, असं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्णन विखे पाटील यांच्याबाबत बोलताना जरांगे म्हणाले.

मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांची झुंज लावण्याचे प्रयत्न

मराठे मराठ्यांच्या अंगावर घालण्यासाठी उपसमिती नाही. त्याचा अध्यक्ष त्यासाठी नाही, तुमचा माज जिरवण्यासाठी उपसमिती नाही. तुमची मस्ती मराठ्यांच्या डोक्यात घालायची आणि मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांची झुंजायला लावायच यासाठी उपसमिती नसते. ईसीबीसीच्या विद्यार्थ्यांचं काय? सारथीच्या विद्यार्थ्यांचं काय? आरोग्य विभागातील विद्यार्थ्यांचं काय? यासाठी उपसमिती असते, पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले.

मराठे मराठ्यांच्या अंगावर घालवण्याची चळवळ सुरू

आम्हला वाटलं होतं 100% मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, मात्र उपसमितीच्या अध्यक्षांनी उलट उफसायला सुरवात केलीय. मराठे मराठ्यांच्या अंगावर घालवण्याची चळवळ त्यांनी सुरू केली, त्यांना मराठ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. याने ते कधीच मोठे होणार नाहीत. त्यांच्या डोक्यात हवा शिरली असेल की, मराठे मराठ्यांच्या अंगावर घालले की मराठ्यांचे प्रश्न दाबले जातील. तुम्ही मराठ्या मराठ्यांमध्ये कलगी तुरा लावून जिंकणार नाहीत हे लक्षात ठेवा. तुम्ही खुप चिखलात चालला आहात.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts