Vaibhav Suryavanshi Controversy : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2026) सर्वात जास्त बोलबाला आहे तो म्हणजे राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals team) आणि त्यांचा स्टार खेळाडू वैभव सुर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) यांचा…मात्र हा बोलबाला खेळाच्या जीवावर आहे का फिक्सिंगच्या जिवावर ? असे सवाल आता उपस्थितीत होऊ लागलेत, आपल्या आक्रमक खेळीनं फेमस झालेला आणि वयाच्या 14 वर्षी आयपीएल गाजवणारा वैभव असा अचानक वादात (Vaibhav embroiled in controversy) कसा सापडला? वैभवची कारकीर्दी सुरू होण्याआधीच हा वाद म्हणजे धोक्याची मोठी घंटा आहे का? याबाबतची सविस्तर माहिती या लेखातून घेऊया…
हेही वाचा – फलंदाजांच्या वादळी खेळीच्या बळावर RCB चा विजय; मुंबईचा सलग तिसरा पराभव
वैभव सूर्यवंशी सापडला वादाच्या भोवऱ्यात
आपीएलच्या १९ व्या मौसमात राजस्थान रॉयल्स आणि १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, कारण डगआऊटमधील ‘त्या’ एका कृतीमुळे फिक्सिंगची चर्चा सुरू झालीय… इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL २०२६ चा हंगाम सध्या मैदानातील अटीतटीच्या लढतींपेक्षा मैदानाबाहेरील एका गंभीर वादामुळे अधिक चर्चेत आला आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग मानल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा ‘भ्रष्टाचार’ आणि ‘नियमभंगाचे’ सावट पाहायला मिळत आहे.
डगआऊटमध्ये मोबाईल फोनच्या वापरामुळे गदारोळ
राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच RCB यांच्यातील सामन्यादरम्यान घडलेल्या एका घटनेने बीसीसीआय आणि अँटी-करप्शन युनिटच्या भुवया उंचावल्या आहेत. डगआऊटमध्ये मोबाईल फोनच्या वापरामुळे हा संपूर्ण गदारोळ निर्माण झाला असून, यामुळे आयपीएलच्या कडक सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
बारकाईने पाहताना कॅमेऱ्यात कैद
राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना सुरू असताना, कॅमेरा राजस्थान रॉयल्सच्या डगआऊटकडे वळला. यावेळी राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर हे आपल्या हातात मोबाईल फोन घेऊन काहीतरी पाहताना किंवा चॅटिंग करताना दिसले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या अगदी शेजारी बसलेला १५ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी हादेखील त्या मोबाईल स्क्रीनकडे बारकाईने पाहताना कॅमेऱ्यात कैद झाला.
डगआऊटमध्ये मोबाईल वापरण्यास सक्त मनाई
आयपीएलच्या नियमांनुसार, ‘प्लेअर्स आणि मॅच ऑफिशिअल्स एरिया’ म्हणजेच डगआऊटमध्ये कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण, विशेषतः मोबाईल फोन वापरण्यास सक्त मनाई आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली.
आयपीएलमध्ये २०१३ च्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर बीसीसीआयने सुरक्षेचे नियम अत्यंत कडक केले आहेत. डगआऊटमध्ये मोबाईल फोन वापरण्यावर बंदी असण्याचे मुख्य कारण म्हणजे बाहेरील व्यक्ती किंवा बुकींशी कोणताही संपर्क होऊ नये. जेव्हा एखादा अधिकारी किंवा खेळाडू डगआऊटमध्ये फोन वापरतो, तेव्हा “माहितीची देवाणघेवाण” होण्याची शक्यता निर्माण होते.
चाहत्यांकडून त्याचा ‘मॉडर्न डे फिक्सिंग’ असा उल्लेख
वैभव सूर्यवंशी हा मैदानात असताना किंवा डगआऊटमध्ये असताना बाहेरील जगाशी संपर्क करू शकत नाही. मात्र, टीम मॅनेजरच्या फोनमध्ये तो डोकावून पाहत असल्याने, त्याला काही ‘सूचना’ दिल्या जात होत्या का? किंवा बाहेरील परिस्थितीबद्दल माहिती दिली जात होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सोशल मीडियावर चाहत्यांनी याला ‘मॉडर्न डे फिक्सिंग’ किंवा ‘नियमभंग’ असे संबोधण्यास सुरुवात केली आहे.
आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू
वैभव सूर्यवंशी हा आयपीएल इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. याच सामन्यात त्याने आरसीबीच्या गोलंदाजांची पिसे काढत अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकले आणि ७८ धावांची तुफानी खेळी केली. एका बाजूला त्याच्या बॅटिंगचे कौतुक होत असताना, दुसऱ्या बाजूला डगआऊटमधील या घटनेमुळे त्याच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. केवळ १५ वर्षांचा असल्याने त्याला नियमांची पूर्ण जाण नव्हती की मॅनेजरने त्याला मुद्दाम काही दाखवले, याचा तपास आता बीसीसीआय करत आहे.
“डगआऊटमध्ये मोबाईल फोन दिसणे ही गंभीर बाब
या प्रकरणाची दखल बीसीसीआयने अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. बीसीसीआयचे सहसचिव देवजित सैकिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “डगआऊटमध्ये मोबाईल फोन दिसणे ही गंभीर बाब आहे. आम्ही या घटनेचा सखोल आढावा घेत आहोत. अँटी-करप्शन युनिट यावर आपला अहवाल सादर करेल. जर नियमांचे उल्लंघन झाले असेल, तर संबंधित व्यक्ती आणि फ्रँचायझीवर कडक कारवाई केली जाईल.” राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाने अद्याप यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही, परंतु सूत्रांनुसार, टीम मॅनेजरने ड्रेसिंग रूममध्ये फोन वापरण्याऐवजी चुकून डगआऊटमध्ये वापरल्याचा दावा केला जात आहे.
राजस्थान रॉयल्ससाठी हा वाद नवीन नाही. २०१३ मध्ये श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या राजस्थानच्या तीन खेळाडूंना स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक झाली होती, ज्यानंतर संघावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. अशा परिस्थितीत, पुन्हा एकदा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
बीसीसीआय मोठा दंड आकारू शकते
बीसीसीआय राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीवर मोठा दंड आकारू शकते. टीम मॅनेजर रोमी भिंडर यांच्यावर काही सामन्यांची बंदी किंवा कायमस्वरूपी निलंबन येऊ शकते. वैभव हा अल्पवयीन आणि नवा खेळाडू असल्याने त्याला केवळ समज देऊन सोडले जाण्याची शक्यता आहे, परंतु त्याच्या वर्तनावर वॉच ठेवला जाईल.
वैभव सूर्यवंशी साठी हा अनुभव धक्कादायक
आयपीएल ही केवळ खेळाची स्पर्धा नसून ती कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारी व्यावसायिक लीग आहे. अशा ठिकाणी नियमांची पायमल्ली होणे हे खेळाच्या भावनेला छेद देणारे आहे. वैभव सूर्यवंशीसारख्या उगवत्या ताऱ्यासाठी हा अनुभव नक्कीच धक्कादायक आहे. आता बीसीसीआयचा अंतिम निर्णय काय येतो, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.












