नवी दिल्ली Nari Shakti Vandan: दिल्लीतील ‘नारी शक्ती वंदन अभियान’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा राजकीय सहभाग बळकट करण्याच्या गरजेवर भर दिला आणि अनेक दशकांपासूनची प्रतीक्षा संपवण्याची वेळ आली आहे, असं सांगितलं (nari shakti vandan abhiyan). या दिशेनं 16, 17 आणि 18 एप्रिल या तारखा निर्णायक ठरतील, असं त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी (pm modi speech) स्पष्ट केलं की, 2023 मध्ये नवीन संसद भवनात ‘नारी शक्ती वंदन कायद्या’च्या रुपात पहिलं पाऊल उचलण्यात आलं होतं. देशाच्या लोकशाही व्यवस्थेत महिलांचा सहभाग अधिक बळकट करणं, हा याचा उद्देश आहे.
हेही वाचा : मोठी घोषणा! नोकरभरतीपासून विकास प्रकल्पांपर्यंत मंत्रिमंडळाचे 7 मोठे निर्णय, 6 जिल्ह्यांना विशेष गिफ्ट
संसदेचं विशेष अधिवेशन 16 एप्रिलपासून :
मोदींनी पुढं सांगितलं की, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून, 16 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान एक विशेष अधिवेशन आयोजित केलं जात आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून महिलांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी ठोस पावलं उचलली जातील. पंतप्रधान मोदी असंही म्हणाले की, ‘नारी शक्ती वंदन’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील लाखो माता आणि भगिनींचे आशीर्वाद मिळत आहेत, ज्यामुळं या उपक्रमाला आणखी बळकटी मिळेल.
संसद ‘नवा इतिहास’ घडवणार :
संसदेच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनापूर्वी महिलांच्या एका परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, संसद या आठवड्यात महिला आरक्षण कायद्यात सुधारणा करुन 2029 मध्ये त्याची अंमलबजावणी करेल आणि ‘नवा इतिहास’ घडवेल. ते म्हणाले की, 2023 मध्ये जेव्हा ‘नारी शक्ती वंदन कायद्या’चं विधेयक मांडण्यात आलं, तेव्हा सर्व पक्षांनी ते एकमतानं मंजूर केलं होतं आणि 2029 पर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याची सामूहिक मागणी होती. ते म्हणाले की, विशेषतः विरोधी पक्षांनी 2029 पर्यंत या विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या गरजेवर जोर दिला होता.
मोदी म्हणाले, “आपल्या देशाची संसद एक नवा इतिहास घडवण्याच्या जवळ आहे. एक असा नवा इतिहास जो भूतकाळातील दूरदृष्टी साकार करेल आणि भविष्यातील संकल्प पूर्ण करेल. हा एका समतावादी भारताचा संकल्प आहे, जिथं सामाजिक न्याय केवळ एक घोषणा नसून आपल्या कार्यसंस्कृतीचा आणि निर्णय प्रक्रियेचा एक नैसर्गिक भाग असेल.”







