Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी नैसर्गिक उपाय; घरच्या घरी करा ‘हा’ फेस पॅक
ताज्या बातम्या

चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी नैसर्गिक उपाय; घरच्या घरी करा ‘हा’ फेस पॅक

Home Remedies To Get Rid Of Facial Pigmentation | बऱ्याच महिलांच्या चेहऱ्यावर वांग (Pigmentation) येण्याची समस्या निर्माण होते. जेव्हा चेहऱ्यावर वांग येतात तेव्हा अनेक महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. मग अनेक महिला वांग घालवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन महागड्या सौंदर्य उपचारांवर पैसे खर्च करतात, पण त्यांना हवा तसा रिझल्ट मिळत नाही. तर तुम्हालाही ही समस्या असले आणि वांग लवकरात लवकर दूर केला पाहिजे असं वाटत असेल तर एक घरगुती नैसर्गिक फेस पॅक नक्की ट्राय करून बघा. हा नैसर्गिक पॅक तुमचा वांग घालवण्यास मदत करतो आणि तुमची त्वचा उजळवण्यास मदत करतो. चला तर मग हा नैसर्गिक फेस पॅक कोणता आणि तो कसा बनवायचा याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – व्हाइटहेड्सपासून सुटका मिळवायची आहे? ‘हे’ सोपे घरगुती उपाय देतील झटपट परिणाम

चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी कोणता फेस पॅक ठरतो प्रभावी?

तुळस आणि मध यांचा फेस पॅक त्वचेवरील वांग कमी करण्यासाठी एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय मानला जातो. तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेतील अशुद्धता कमी करून त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे वांग तयार होण्यामागील कारणांवरही नियंत्रण मिळवता येते.

मध त्वचेला खोलवर मॉइश्चर देतो आणि तिची नैसर्गिक चमक वाढवतो. मधातील पोषक घटक त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करतात, ज्यामुळे वांग हळूहळू फिकट होण्यास मदत होते. त्यामुळे मध आणि तुळस या दोन्ही घटकांचा एकत्रित वापर केल्यास त्वचा मऊ, स्वच्छ आणि निरोगी दिसू लागते.

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुळशीची काही पाने स्वच्छ धुवा. त्यानंतर या पानांची पेस्ट बनवा आणि त्यात एक चमचा मध मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर 10 ते15 मिनिटे लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यास वांग कमी होण्यास आणि त्वचा उजळण्यास मदत मिळू शकते.

हा फेस पॅक लावण्यासोबतच त्वचा स्वच्छ ठेवणे, योग्य आहार घेणे आणि पुरेसं पाणी पिणेही तितकंच महत्त्वाचं आहे. नियमितपणे हा नैसर्गिक उपाय केल्यास हळूहळू वांग कमी होऊन त्वचा अधिक निरोगी, स्वच्छ आणि चमकदार दिसू शकते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts