Amravati Crime | एकिकडे नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरातने (Ashok Kharat) अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अशातच आता अमरावतीमध्ये (Amravati) देखील एक असाच सर्वांना हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एक युवकानं अनेक तरूणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे अमरावतीत एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – नितीश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर बिहारमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? नावही ठरलं अन् शपथविधीचा मुहूर्तही ठरला
अमरावतीत 180 तरूणींवर लैंगिक अत्याचार, आरोपीने व्हिडीओही केले व्हायरल
अमरावतीमधील मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर नावाच्या एक तरूणाने अनेक तरूणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच हा तरूण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या तरूणींचे आक्षेपार्ह व्हिडीओ काढत ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मदवर गुन्हा दाखल केला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद हा अनेक तरूणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करत होता. आरोपी मोहम्मदने जवळपास 180 मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आरोपीने तरूणींसोबत शरीरसंबंध ठेवत व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. तर त्याने हे व्हिडीओ व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल केले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे.
पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करणार असून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील आरोपी मोहम्मद हा राजकीय पक्षाचा नेता आहे. तो MIM पक्षाचा पदाधिकारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. या प्रकरणाची दखल घेत सोमवारी अनिल बोंडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांची भेट घेतली होती. तर या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी अनिल बोंडे यांनी केली होती.












