Trump Threatens Iran : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नवी धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी सांगितलं की, त्यांचं पथक उद्या (सोमवारी) पाकिस्तानमधील इस्लामाबादला जात आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी एक नवीन, पारदर्शक आणि न्याय्य करार सादर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर इराणींनी हा करार स्वीकारण्यास नकार दिला, तर ते त्यांचं वीज प्रकल्प आणि पूल नष्ट करतील. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टद्वारे तेहरानला ही धमकी दिली.
हेही वाचा : तामिळनाडूच्या विरुधुनगरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; 16 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील इराणचा गोळीबार हा शस्त्रसंधीचं गंभीर उल्लंघन :
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “इराणनं काल होर्मुझच्या सामुद्रधुनीत गोळीबार केला. हे आमच्या शस्त्रसंधी कराराचं संपूर्ण उल्लंघन आहे. यापैकी अनेक गोळ्या एका फ्रेंच जहाजावर आणि एका ब्रिटिश मालवाहू जहाजावर झाडण्यात आल्या. ही चांगली गोष्ट नव्हती, नाही का? माझे प्रतिनिधी पाकिस्तानमधील इस्लामाबादला जात आहेत आणि ते उद्या संध्याकाळी तिथं पोहोचतील, जिथं चर्चा होईल.” ते पुढं म्हणाले, “इराणनं अलीकडेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली आहे, जे विचित्र आहे कारण आमच्या नाकेबंदीमुळं ती आधीच बंद आहे. ते नकळतपणे आमची सेवा करत आहेत. या बंदमुळं त्यांना सर्वाधिक नुकसान होत आहे, दररोज अंदाजे 500 दशलक्ष डॉलर्स.”
होर्मुझ बंद असल्यामुळं अमेरिकेचं कोणतंही नुकसान होत नाही :
ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये पुढं लिहिलं, “अमेरिकेचं कोणतंही नुकसान होत नाही. किंबहुना, अनेक जहाजे सध्या तेल भरण्यासाठी अमेरिकेकडे, टेक्सास, लुइझियाना आणि अलास्काकडे जात आहेत. हे सर्व आयआरजीसीमुळं (IRGC) होत आहे. हे इराणींमुळं घडत आहे, जे नेहमीच “मजबूत” राहण्याचा प्रयत्न करतात! आम्ही एक अतिशय न्याय्य आणि वाजवी करार देऊ करत आहोत. मला आशा आहे की ते तो स्वीकारतील, कारण जर त्यांनी तो स्वीकारला नाही, तर अमेरिका इराणमधील प्रत्येक वीज प्रकल्प आणि प्रत्येक पूल नष्ट करेल. आता आणखी चांगुलपणा नको! (आता आणखी सौम्य भूमिका नको!) ते लवकर पडतील, ते सहज पडतील. जर त्यांनी करार स्वीकारला नाही, तर जे करणं आवश्यक आहे ते करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट असेल. गेल्या 47 वर्षांत इतर राष्ट्राध्यक्षांनी इराणसोबत जे करायला हवं होतं, तेच आता इराणची संहारक यंत्रणा नष्ट करण्याची वेळ आली आहे!





