Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • नाशिक TCS प्रकरण तापलं; कंपनीची निदा खानवर कडक कारवाई, नेमकं काय घडलं?
Top News

नाशिक TCS प्रकरण तापलं; कंपनीची निदा खानवर कडक कारवाई, नेमकं काय घडलं?

Nashik TCS Company Case | नाशिकमध्ये (Nashik) एकामागून एक धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. आधी भोंदू अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. नंतर नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Nashik TCS Company) या कंपनीत अनेक महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ज्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एक महिला आणि सात पुरूष आरोपींना अटक केली आहे. तसेच सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली एचआर निदा खानवर (HR Nida Khan) टीसीएस कंपनीने मोठी कारवाई केली आहे.

हेही वाचा – मोठी राजनैतिक हालचाल; रियाधमध्ये अजित डोवाल यांनी सौदी नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय झाली चर्चा?

TCS कंपनीची निदा खानवर कडक कारवाई

टीसीएस कंपनीने एचआर निदा खानवर मोठी अॅक्शन घेतली आहे. निदा खानला कंपनीने सस्पेंड केलं आहे. निदा खानवर गंभीर आरोप असल्यामुळे ती आपल्या कर्तव्यांचे पालन करू शकत नाही, असं कारण देत कंपनीने निदा खानला सस्पेंड केले आहे. 9 एप्रिल 2026 रोजी कंपनीने तिच्यावर ही कारवाई केली आहे.

27 डिसेंबर 2021 रोजी निदा खान ही टीसीएस कंपनीत प्रोसेस असोसिएट म्हणून रूजू झाली होती. तर आता निदा खानला कंपनीने काढून टाकले आहे. निदा खान ही टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावर धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे आरोपी निदा खानवर कंपनीने कडक कारवाई करत तिचे सर्व नेटवर्क अॅक्सेस बंद केले आहेत. तसेच ऑफिसमध्ये येण्यास मनाई, कोणत्याही कर्मचाऱ्यासोबत या प्रकरणाबाबत संपर्क न ठेवणे आणि कंपनीचे सर्व सामान परत करणे असे नियम कंपनीने निदा खानवर लादले आहेत. तसेच निदा खानने या आदेशांचं पालन केलं नाही तर तिच्यावर अतिरिक्त शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

आरोपी निदा खान ही मागील काही दिवसांपासून फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे. तसेच आरोपी निदा खान ही गरोदर असल्याची माहिती देखील समोर आली आहे. सध्या ती मुंबईत राहत असून लवकरच ती बाळाला जन्म देणार असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी दिली आहे. तसेच निदा खानने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

फरार निदा खानने नाशिकच्या स्थानिक कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. तर या अटकपूर्व जामीन अर्जात निदाने वैद्यकीय परिस्थीतीचा हवाला दिला असून त्या आधारावर तिने अटकपूर्व जामीन देण्याची मागणी केली आहे. तर आता निदाच्या या अर्जावर कोर्टात काय निर्णय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच नाशिक पालीस हे निदा खानचा शोध घेत असून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts