Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • “तू खूप छान दिसतेस, एकटी राहतेस का?” रॅपिडो ड्रायव्हरने तरूणीला केले धक्कादायक मेसेज, नेमकं घडलं काय?
Top News

“तू खूप छान दिसतेस, एकटी राहतेस का?” रॅपिडो ड्रायव्हरने तरूणीला केले धक्कादायक मेसेज, नेमकं घडलं काय?

Rapido Women Harrasment | मागील काही दिवसांपासून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचं चित्र दिसत आहे. नाशिकमध्ये (Nashik) भोंदू अशोक खरातने (Ashok Kharat) अनेक महिलांचे, तरूणींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर नाशिकमधील टीसीएस कंपनीत (Nashik TCS Company) महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करत त्यांच्यावर धर्मांतराचा दबाव टाकण्यात आला होता. तसेच अमरावतीमधील परतवाडा (Paratwada) येथे तब्बल 180 तरूणींचे लैंगिक शोषण करत त्यांचे व्हिडीओ, फोटो व्हायरल करण्यात आले. या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून निघाला असून महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येत आहे. आताही एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे. एका तरूणीसोबत रॅपिडो (Rapido) ड्रायव्हरने आक्षेपार्ह असं वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा – भूकंपाने दणका; मणिपूर हादरला, ईशान्य राज्यांमधील लोकांनी सोडली घरे

रॅपिडो ड्रायव्हरची तरूणीसोबत आक्षेपार्ह वर्तणूक

आजकाल बऱ्याच तरूणी सुरक्षेच्या दृष्टीने, लवकर घरी किंवा कामाच्या ठिकाणी पोहोचण्याच्या अनुषंगाने ऑनलाईन कॅब, रॅपिडो बुक करतात. मात्र, आता या ऑनलाईन कॅब, रॅपिडो बाईक बुक करणंही असुरक्षित झालं आहे. कारण एका तरूणीचा रॅपिडो सेवेचा वापर झाल्यानंतर संबंधित रॅपिडो चालकाने तिला आक्षेपार्ह मेसेज केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ स्वत: तरूणीने शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच तिने चालकाने केलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत.

रॅपिडो ड्रायव्हरने तरूणीला नेमके काय केले मेसेज?

अनुष्का नावाच्या एका तरूणीचे तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिला आलेला भयानक असा अनुभव शेअर केला आहे. अनुष्का ही उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील असून तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अनुष्काने दिलेल्या माहितीनुसार, तिने रात्रीच्या वेळी रॅपिडो राईड बुक केली होती. तिची राईड पूर्ण झाल्यानंतर तिला तिच्या ड्रॉप पॉईंटवर सोडल्यानंतर काही वेळानंतर रेपिडॉ ड्रायव्हरने थेट तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज केले. “हाय, ओळखलं नाहीस का? आत्ता तर मी तुला ड्रॉप करून आलो, असा मेसेज ड्रायव्हरने केला. त्यानंतर अनुष्काने तू रॅपिडो रायडर आहेस का? असा सवाल विचारला. त्यावर तो हो असं उत्तर देतो. त्यानंतर तू खूप क्यूट दिसतेस, ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होतीस. तुझं वय काय आहे? असे मेसेजही ड्रायव्हरने तिला केले.

पुढे तो म्हणाला की, अगं काळजी करू नकोस, मी असा तसा मुलगा नाहीये. तू एकटी राहतेस का? त्यावर अनुष्का संतापते आणि त्याला तुला काय करायचं आहे जाणून, तू तुझं काम कर असं बोलते. त्यावर तो म्हणतो की, तू तर रागावलीस. तुला काही हरकत नसले तर मला उद्या भेटशील का 4 वाजता? असे आक्षेपार्ह मेसेज रॅपिडो ड्रायव्हरने केल्याचा दावा अनुष्काने केला आहे. तसेच तिने या चॅटचे स्क्रिनशॉट देखील शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka_Official☀️ (@aanu_shka3)

अनुष्काने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेक नेटकऱ्यांनी रॅपिडो ड्रायव्हरवर संताप व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी तरूणींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह देखील निर्माण केले आहे.

दरम्यान, अनुष्काच्या या पोस्टची दखल रॅपिडो कंपनीने घेतली आहे. रॅपिडो कंपनीतर्फे अनुष्काच्या कमेंट सेक्शनमध्ये रिप्लाय देण्यात आला आहे. या घटनेबाबत कंपनीने खेद व्यक्त करत असं वागणं अस्वीकारार्ह असल्याचं म्हटलं आहे. तर या प्रकरणी रॅपिडो ड्रायव्हरची तातडीने चौकशी करण्यात येणार असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts