Top News

भूकंपाने दणका; मणिपूर हादरला, ईशान्य राज्यांमधील लोकांनी सोडली घरे

manipur

Earthquake In Manipur | मणिपूरमध्ये (Manipur) 5.2 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) जाणवला आहे. मणिपूरसोबतच नागालँड (Nagaland), आसाम (Assam) आणि मेघालयमध्येही (Meghalaya) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 62 किलोमीटर खोल होता. या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याचे तात्काळ वृत्त समोर आलेले नाहीये.

हेही वाचा – मान्सूनपूर्वी मुंबईत पावसाची एन्ट्री? हवामान खात्याचा यलो अलर्ट, जोरदार वाऱ्याचा इशारा

मणिपूरमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप, लोकांनी घाबरून सोडली घरं

राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, मंगळवारी पहाटे मणिपूरमध्ये 5.2 तीव्रतेचा भूकंप झाला. हा भूकंप 21 एप्रिल रोजी पहाटे 5.50 च्या सुमारास झाला आणि त्याचे केंद्र कामजोंग (Kamjong) येथे होते. लोकं गाढ झोपेत असतानाच भूकंप झाला आणि या भूकंपाचे धक्के एवढे जोरदार होते की लोक जीव वाचवण्यासाठी घराबाहेर धावले. पहाटे झालेल्या या भूकंपाच्या धक्क्याने घाबरून लोक आपापल्या घरातून बाहेर पळू लागले आहेत.

आज पहाटे मणिपूरमध्ये मोठा भूकंप जाणवला. तर मणिपूरसोबत आसाम, नागालँड आणि मेघालयमध्ये देखील भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे मणिपूरसह नागालँड, आसाम आणि मेघालयमधील लोकांनी आपली घरे सोडून तिथून पळ काढला आहे. भूकंपाचे धक्के एवढे जास्त होते की लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, आत्तापर्यंत या भूकंपात कोणतीही जीवितहानी किना मालमत्तेची हानी झालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर मणिपूरचे प्रशासन सध्या या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून त्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सोबतच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन देखील प्रशासनाने केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts