• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • बंगाल, मणिपूरमधील शहरांसह लेह-लडाखला भूकंपाचा जोरदार धक्का; सुदैवानं जिवितहानी नाही
Top News

बंगाल, मणिपूरमधील शहरांसह लेह-लडाखला भूकंपाचा जोरदार धक्का; सुदैवानं जिवितहानी नाही

Buildings and terrain affected by earthquake in Bengal, Manipur, and Leh-Ladakh regions

Earthquake in Bengal : लेह-लडाखपासून अंदमान समुद्रापर्यंत आज विविध ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, सर्व भूकंप सौम्य ते मध्यम तीव्रतेचे होते. एनसीएस नुसार, पहाटे 3:38 वाजता बंगालच्या उपसागरात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. त्यानंतर 4:11 वाजता मणिपूरमधील उखरुल इथं 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर, पहाटे 4:31 वाजता, लडाखमधील लेह हे 3.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे केंद्र होते. यात आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही. याव्यतिरिक्त, बुधवारी रात्री 12:18 वाजता अंदमान समुद्रात 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला.

लेहमध्ये 3.7 रिश्टर स्केलचा भूकंप :

आज पहाटे लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (NCS) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.7 रिश्टर स्केलची होती. भूकंपाचं केंद्र भूपृष्ठापासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होते. एनसीएसनं एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, पहाटे 4:31 वाजता भूकंपाची नोंद झाली. लेह हे भूकंप क्षेत्र 4 मध्ये आहे, जिथे मध्यम ते तीव्र भूकंपांचा सतत धोका असतो. या वर्षी आतापर्यंत लडाखमध्ये 4.0 पेक्षा जास्त तीव्रतेचे पाच भूकंप नोंदवले गेले आहेत. मार्चमध्ये आलेला 5.1 तीव्रतेचा भूकंप सर्वात शक्तिशाली होता.

 

मणिपूर देखील भूकंपाचं केंद्र :

मणिपूर राज्यातील उखरुल जिल्ह्यातही सकाळच्या सुमारास 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप आला. भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) पहाटे 4:11 वाजता हा भूकंप जाणवला. एनसीएसनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केलं की भूकंपाचं केंद्र 40 किलोमीटर खोलीवर होतं. हे लक्षात घेण्यासारखं आहे की नवीन भूकंपीय नकाशानुसार, मणिपूर भूकंप क्षेत्र 6 मध्ये येतो, जिथं मध्यम ते तीव्र भूकंपांचा सतत धोका असतो. याव्यतिरिक्त, पहाटे 3:38 वाजता बंगालच्या उपसागरात 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला. अंदमान समुद्रातही रात्री 12:18 वाजता 4.2 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला.

हे ही वाचा : कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन 4 जानेवारी 2026 रोजी होणार

जगात सर्वाधिक भूकंप जपानमध्ये होतात :

जगात सर्वाधिक भूकंप जपानमध्ये होतात. हे प्रामुख्यानं प्लेट टेक्टोनिक्समुळं होतं. ते रिंग ऑफ फायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात स्थित आहे. येथे पॅसिफिक प्लेट, युरेशियन प्लेट आणि फिलीपीन प्लेट सारख्या अनेक मोठ्या टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात. त्या एकमेकांखाली सरकतात किंवा घासतात. यामुळं पृथ्वीवर ताण निर्माण होतो आणि अचानक उर्जेचं उत्सर्जन झाल्यामुळं भूकंप होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts