• Home
  • महाराष्ट्र
  • चक्क शासकीय वाहन केले चोरी; २४ तासांत पोलिसांनी केली आरोपीस अटक
गुन्हा

चक्क शासकीय वाहन केले चोरी; २४ तासांत पोलिसांनी केली आरोपीस अटक

Stolen government car with police investigation markings

Government vehicle theft : पिंपळनेर बसस्थानकातून एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाचे शासकीय वाहन चोरीला गेल्याची घटना घडल्याचे समोर आले होते. आता अधिकाऱ्यांनी बसस्थानक परिसरात लावलेले हे वाहन 24 तासांच्या आत हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला शोधण्यातले.

एसटी महामंडळाच्या तपासणी पथकाचे अधिकारी यांनी बसस्थानक परिसरात मुक्कामी लावलेले वाहन चोरीला गेले होते. हे वाहन मध्यरात्री 12 वाजून 10 मिनिटांनी चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेबाबत पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने चोरलक पकडणे शक्य झाले.

हे ही वाचा : पार्थ पवारांचे नाव FRI मध्ये काही नाही?; हायकोर्टाने सरकारला विचारला जाब

पिंपळनेर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) किरण बर्गे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ तपासाची सूत्रे हलवली. आणि आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी किरण गायकवाड हा आमळी गावाच्या परिसरात चोरीच्या वाहनासह फिरत असल्याचे निष्पन्न झाले होते.

एपीआय किरण बर्गे, पीएसआय विजय चौरे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक वाघ यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी किरण गायकवाड याच्या मुसक्या आवळल्या. तसेच, सुमारे 10 लाख 15 हजार रुपये किमतीचे चोरीस गेलेले वाहन आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या शासकीय वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला असून, आरोपी किरण गायकवाड याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts