• Home
  • राजकारण
  • मद्य विक्री दुकानासाठी सोसायटीची ‘ना हरकरत’ घेणं बंधनकारक
Top News

मद्य विक्री दुकानासाठी सोसायटीची ‘ना हरकरत’ घेणं बंधनकारक

housing society approval

पुढील काळात राज्यातील वाई शाॅप, किरकोळ देशी दारू विक्री दुकानांना गृहनिर्माण संस्थांचा ना हरकत प्रमाणपत्र घेण बंधकारक असणार आहे, अशा माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची ‘ना हरकत’ घेणे बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे पुढील काळात मद्य विक्रीकरांना चाप बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गृहनिर्माण संस्था एवढ्या सहजरित्या ना हरकत प्रमाणपत्र देतील हे वाटतंय तेवढं सहज नाही. 

काळेवाडी-रहाटणी परिसरातील नियमबाह्य दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याबाबत सदस्य शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पिंपरी चिंचवड मधील बजाज देशी दारू दुकान आणि विक्रांत वाईन्स शॉप या दोन्ही दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. परंतु त्यातील एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा – महायुतीत कुरघोडी! अजित पवारांनी भाजपचा लातूरातील मोठा नेता फोडला

संरक्षण चौकीसारख्या ठिकाणी वनअधिकारी मद्यपान करतानाचा व्हिडिओ

मुंबईत नॅशनल पार्क अर्थात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही वनअधिकाऱ्यांनी दारु पार्टी केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संरक्षण चौकीसारख्या ठिकाणी वनअधिकारी मद्यपान करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला आणि तो कसा प्रसारित झाला, याचाही शोध घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेत.

 हॉटेल्स पब आणि बार नियम मोडतात

डिसेंबर महिन्याचा पहिला महिना उलटून गेला आहे. त्यामुळे आता जगभरातील लोकांना नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. भारतातही मोठ्या उत्साहात नवीन वर्षांचे स्वागत केले जाते. अनेक लोक मद्यपान पिऊन पार्टी करतात. या काळात काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. कारण अनेक हॉटेल्स पब आणि बार नियम मोडतात. यामुळे एखादी दुर्घचना घडण्याची शक्यता असते. यामुळे आता नववर्षाच्या स्वागत समारंभांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 22 ते दिनांक 28 डिसेंबर 2025 दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सर्व हॉटेल्स्, रेस्टॉरंट, पब, बारची तपासणी केली जाणार आहे. आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्यास कारवाई होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts