Breaking News :
क्रीडा

घरच्या मैदानावर लखनऊचा पराभव; राजस्थानचा मोठा विजय

घरच्या मैदानावर लखनऊचा पराभव; राजस्थानचा मोठा विजय
56

लखनऊ RR Beat LSG : आयपीएल 2026 चा 32 वा सामना 22 एप्रिल रोजी, भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. राजस्थाननं हा सामना जिंकून पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतला आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा हंगामातील हा सलग चौथा पराभव आहे. या सामन्यात राजस्थाननं लखनऊला 40 धावांनी पराभूत केले. राजस्थाननं दिलेलं 160 धावांचं लक्ष्य गाठताना लखनऊचा संघ 18 षटकांत 119 धावांवर सर्वबाद झाला. या हंगामातील रॉयल्सचा हा पाचवा विजय आहे. 10 गुणांसह ते आता चौथ्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. 11 गुणांसह केवळ पंजाब किंग्स त्यांच्या वर आहे. आरसीबी आता 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरली आहे. तर लखनऊ 4 गुणांसह गुणतालिकेत 9 व्या स्थानावर आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! भारताकडे जाणाऱ्या जहाजावर आयआरजीसीचा होर्मुझमध्ये हल्ला; जहाज जप्त

जोफ्रा आर्चरनं घेतले 3 बळी :

राजस्थाननं दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्सकडून मिचेल मार्शनं सर्वाधिक 55 धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज प्रभाव पाडू शकला नाही. आयुष बडोनी, ऋषभ पंत आणि एडन मार्कराम शून्यावर बाद झाले. निकोलस पूरननं 22 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक तीन बळी घेतले. नंद्रे बर्गर आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. रवींद्र जडेजा आणि रवी बिश्नोई यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.

राजस्थानची प्रथम फलंदाजी :

तत्पुर्वी सामन्यात लखनऊ सुपरजायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सनं 6 गडी गमावून 159 धावा केल्या. संघाकडून रवींद्र जडेजा 43 धावांसह सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. इतर फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आली नाही. गोलंदाजीत लखनऊकडून मोहम्मद शमी, प्रिन्स यादव आणि मोहसिन खान यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts