Zeekr 8X SUV Launch: चीनच्या ऑटोमोबाईल बाजारात नव्याने लॉन्च झालेल्या या इलेक्ट्रिक suv ने अवघ्या एका तासात १० हजारांहून अधिक बुकिंग्स मिळवत मोठी खळबळ उडवली आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे या गाडीची क्रेझ आणि मागणी स्पष्टपणे दिसून येत आहे.
चीनच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारात नुकत्याच लॉन्च झालेल्या या नवीन suv ने अवघ्या काही वेळातच विक्रमी प्रतिसाद मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लॉन्चनंतर केवळ एका तासात १० हजारांहून अधिक बुकिंग्स नोंदवल्या गेल्याने या कारची प्रचंड मागणी आणि ग्राहकांमधील उत्साह स्प्ष्टपणे दिसून येतो. प्रगत तंत्रज्ञान, लक्झरी फीचर्स आणि दमदार परफॉर्मन्समुळे ही SUV बाजारात चर्चेचा विषय ठरली आहे.
हेही वाचा: छोट्या गोष्टींचा मोठा बाऊ करणाऱ्या ‘या’ 4 राशी; पाहा तुम्हीही आहात का यात?
बुकिंगचा विक्रमी प्रतिसाद
Zeekr 8X चे बुकिंग सुरू होताच केवळ ३८ मिनिटांत १०,००० पेक्षा जास्त ऑर्डर्स मिळाल्या. पुढील ४८ तासांत हा आकडा ३०,००० पेक्षा अधिक झाला. या आकड्यांवरून या suv ची लोकप्रियता स्पष्ट होते.
किंमत आणि व्हेरिएंट्स
ही इलेक्ट्रिक SUV Max, Ultra, Ultra+ आणि टॉप व्हेरिएंट Yaoying अशा अनेक प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. चीनमध्ये तिची किंमत अंदाजे 45 लाख रुपयांपासून सुरू होऊन 69 लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे ही प्रीमियम सेगमेंटमधील लक्झरी SUV ठरते.
परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञान
Zeekr 8X मध्ये आधुनिक इलेक्ट्रिक मोटर आणि अॅडव्हान्स तंत्रज्ञानाचा संगम आहे. काही व्हेरिएंट्समध्ये ही SUV अत्यंत जलद वेग वाढवू शकते आणि काही सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास गाठते.
यामध्ये दीर्घ ड्रायव्हिंग रेंज मिळते, त्यामुळे एकदा चार्ज केल्यावर ती लांबचा प्रवास सहज करू शकते. तसेच फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे बॅटरी कमी वेळात चार्ज होते.
लक्झरी इंटिरियर आणि सेफ्टी फीचर्स
या suv चे इंटिरियर अत्यंत आधुनिक आणि प्रीमियम आहे. मोठी टचस्क्रीन, स्मार्ट इंफोटेनमेंट सिस्टम, आरामदायक सीट्स आणि अॅडव्हान्स ड्रायव्हिंग फीचर्स यामुळे ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक खास बनतो. सेफ्टी आणि स्मार्ट ड्रायव्हिंग तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला असून, चालकाला मदत करणारी अनेक आधुनिक फीचर्स या कारमध्ये देण्यात आली आहेत.







