Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठी भाषा शिकणे सोपे होणार; सरकारकडून विशेष पुस्तिका जारी, मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की….
Top News

मराठी भाषा शिकणे सोपे होणार; सरकारकडून विशेष पुस्तिका जारी, मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की….

marathi language mandatory drivers: महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. चालकांसाठी मराठी शिकण्यासाठी १ मे १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून, यासाठी विशेष पुस्तिकाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार हिंदी भाषिक चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात आला असून, १ मे ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे.

हेही वाचा: हेल्दी ब्रेकफास्ट आयडिया! काकडी इडलीची सोपी रेसिपी जाणून घ्या

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी कॅबिनेट बैठकीनंतर याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, चालकांना मराठी शिकण्यासाठी एक विशेष पुस्तिका तयार करण्यात आली आहे. ही पुस्तिका राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सरकारकडून चालक संघटनांना देखील यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक संघटनांनी यापूर्वी मराठी शिकण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार आता सरकारने मुदत दिली असून, चालकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी संघटनांवरही सोपवण्यात आली आहे.

या मोहिमेदरम्यान आरटीओ अधिकारी चालकांची तपासणी करणार असून, त्यांना मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान आहे की नाही हे पाहिले जाईल. तसेच वाहन चालवताना नियमांचे पालन होते का, याचीही खातरजमा केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारने तयार केलेल्या पुस्तिकेत दैनंदिन वापरातील सोपी वाक्ये देण्यात आली आहेत. याशिवाय, ही माहिती मोबाईलवरही उपलब्ध करून देण्यात येणार असून, QR कोडच्या माध्यमातून ऑडिओ स्वरूपात मार्गदर्शन मिळणार आहे.

मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, मराठी ही राज्याची अधिकृत भाषा असून, राज्यात व्यवसाय किंवा वास्तव्य करायचे असल्यास तिचे ज्ञान आवश्यक आहे. या उपक्रमामुळे चालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts