Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; मुंबई-पुण्यादरम्यान दररोज वाचणार सुमारे 1 कोटी रुपयांचं इंधन
Mumbai

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; मुंबई-पुण्यादरम्यान दररोज वाचणार सुमारे 1 कोटी रुपयांचं इंधन

'मिसिंग लिंक' प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; मुंबई-पुण्यादरम्यान दररोज वाचणार सुमारे 1 कोटी रुपयांचं इंधन

पुणे Missing Link Project : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचं उद्घाटन केलं. या प्रकल्पामुळं मुंबई आणि पुणे दरम्यानचं अंतर तर कमी होईलच, शिवाय धोकादायक लोणावळा घाट भागातील प्रचंड वाहतूक कोंडीची समस्याही कायमस्वरुपी दूर होईल. याशिवाय, यामुळं मुंबई आणि पुणे दरम्यानचं अंतरही कमी होईल. या उद्घाटनावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्दिकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबईत 4 तासांसाठी बंद राहणार रेल्वे

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद :

या प्रकल्पात समाविष्ट असलेले दोन बोगदे आधुनिक अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करुन बांधण्यात आले आहेत. सह्याद्री पर्वतरांगेतून प्रत्येकी 23.50 मीटर रुंदीचे हे बोगदे खोदणं हे एक मोठं आव्हान होतं. यामुळंच, जगातील सर्वात रुंद बोगदे म्हणून त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचं प्रमाणपत्र स्वीकारलं.

आधुनिक तंत्रज्ञानाचं उदाहरण :

दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून सुमारे 180 मीटर खाली आहे. शिवाय, या प्रकल्पाचं मुख्य आकर्षण म्हणजे टायगर व्हॅलीमध्ये असलेला 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज, जो दोन्ही बोगद्यांना जोडतो. 182 मीटर उंच दोन खांब आणि 240 केबल्सच्या आधारानं उभारलेला हा पूल आधुनिक तंत्रज्ञानाचं एक अद्वितीय उदाहरण आहे.

दररोज सुमारे 1 कोटी रुपयांचं इंधन वाचणार :

हा नवीन मार्ग सुरु झाल्यामुळं वाहनांच्या इंधनात बचत होऊन दररोज सुमारे 1 कोटी रुपयांची आर्थिक बचत होण्याची अपेक्षा आहे, तसंच प्रदूषणाची पातळीही लक्षणीयरीत्या कमी होईल. खडबडीत दऱ्या आणि प्रतिकूल हवामानाच्या आव्हानांवर मात करुन हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. येत्या काही वर्षांत, हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

6600 कोटी रुपये खर्चानं बांधलेला प्रकल्प :

एमएसआरडीसीनं बांधलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाला अंदाजे 6600 कोटी रुपये खर्च आला आहे. यामध्ये जमिनीपासून सुमारे 180 मीटर उंचीवर असलेल्या आशियातील सर्वात उंच केबल-स्टेड ब्रिजचा समावेश आहे. पर्यावरणाचा विचार करुन, बोगद्याच्या आत आधुनिक व्हेंटिलेशन प्रणाली आणि अग्निशमन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts