• Home
  • लाईफस्टाईल
  • टीपू सुलतान प्रेरणास्थान, छत्रपती शिवरायांचाही उल्लेख; अमरावतीतील लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल
Top News

टीपू सुलतान प्रेरणास्थान, छत्रपती शिवरायांचाही उल्लेख; अमरावतीतील लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

Amravti Wedding Card

Amravati Viral Wedding Card: सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. कधी एखादा फोटो, तर कधी एखादी साधीशी गोष्टही चर्चेचा विषय बनते. अशातच सध्या एक हटके लग्नपत्रिका सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अमरावती जिल्ह्यातील एका लग्नपत्रिकेमुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. यात टीपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांचा उल्लेख करण्यात आल्याने विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही लग्नपत्रिका वलगावजवळील मिर्झापूर येथील एका विवाह सोहळ्याशी संबंधित आहे. पत्रिकेत ‘शेरे मैसूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीपू सुलतान यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्याबाबत काही ऐतिहासिक संदर्भही नमूद करण्यात आले असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे.

हेही वाचा: आजपासून जनगणनेला सुरुवात! घरबसल्या मोबाईलवर करा ‘स्व-गणना’; जाणून घ्या प्रक्रिया

याचबरोबर पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांचाही उल्लेख प्रेरणास्थान म्हणून करण्यात आला आहे. विविध ऐतिहासिक दावे आणि संदर्भ एकाच पत्रिकेत मांडल्यामुळे या विषयावर चर्चा अधिक रंगली आहे.

ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही नागरिकांनी त्यातील मजकुराच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काहींनी या प्रकारावर नाराजीही व्यक्त केली आहे.

दरम्यान, या पत्रिकेतील दाव्यांची अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाकडे सध्या चर्चेचा विषय म्हणूनच पाहिले जात आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts