Census 2026 India: राज्यात सर्वत्र आज, १ मे २०२६ पासून जनगणनेला सुरुवात झाली आहे. यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीने होत असून नागरिकांना स्वतःहून घरबसल्या माहिती भरण्याची ‘स्व- गणना’ सुविधा प्रथमच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्याच्या मुख्य जनगणना अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे १५ मे या कालावधीत नागरिकांना अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन माहिती भारत येणार आहे. ही प्रक्रिया ऐच्छिक असली तरी नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा: मे महिन्यात तब्ब्ल १२ दिवस बँका राहणार बंद! पाहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी
स्व-गणना म्हणजे काय?
स्व-गणना ही अशी पद्धत आहे ज्यामध्ये नागरिक स्वतः आपल्या कुटुंबाची माहिती ऑनलाइन स्वरूपात भरू शकतात. यामुळे जनगणना प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
स्व-गणना करण्याची प्रक्रिया
अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा
एका कुटुंबासाठी एकदाच नोंदणी करा
एकूण ३३ प्रश्नांची माहिती अचूक भरा
कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही
सर्व माहिती भरल्यानंतर ११ अंकी युनिक आयडी मिळेल
हा आयडी पुढील पडताळणीसाठी जतन करून ठेवा
घरगुती पडताळणी कधी होणार?
स्व-गणना पूर्ण केल्यानंतर किंवा न केल्यास, १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान जनगणना अधिकारी घरोघरी भेट देऊन माहितीची पडताळणी करतील. स्व-गणना केलेल्या नागरिकांना यावेळी त्यांचा युनिक आयडी दाखवावा लागेल.
महत्त्वाच्या सूचना
केवळ अधिकृत संकेतस्थळावरच माहिती भरा
अनोळखी लिंक, ई-मेल किंवा एसएमएसवर विश्वास ठेवू नका
कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही
वैयक्तिक माहिती शेअर करताना सावधगिरी बाळगा
प्रशासनाचे आवाहन
राज्यभरात ही प्रक्रिया राबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन जनगणना प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.












