• Home
  • देश
  • भारताचा कोणत्या देशाला पाठिंबा? युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
Top News

भारताचा कोणत्या देशाला पाठिंबा? युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

pm modi

PM Narendra Modi | अमेरिका-इस्त्रायल (America-Israel) या दोन देशांनी मिळून इराणवर (Iran) हल्ला केल्यानंतर युद्धाचा वणवा पेटला आहे. इराणनेही प्रत्युत्तर देत अमेरिका आणि इस्त्रायलवर जोरदार हल्ला केला आहे. त्यामुळे सध्या या देशांमध्ये तणावाचे वातावारण आहे. तर या युद्धजन्य परिस्थितीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – युद्धाचा फटका! दुबईत अडकला महाराष्ट्रातील बडा नेता; फ्लाइट्स रद्द, परतीचा मार्ग झाला बंद

भारत कोणत्या देशासोबत? पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्या जगभरात तणावाचे वातावरण आहे. अशा स्थितीत आपला भारत देश शांतता आणि स्थैर्याचा समर्थक राहिला असून भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे.

भारत हा सर्व देशांसोबत असून त्यांना सहकार्य करत संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे जेव्हाही दोन लोकशाही देश एकत्र उभे राहतात तेव्हा शांततेचा आवाज अधिक मजबूत होतो, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये सांगितले आहे की, इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत त्यांची फोनवर चर्चा झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी लवकरात लवकर शत्रुत्व समाप्त करण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts