• Home
  • राजकारण
  • “रिपोर्ट दारू पिऊन बनवला…”, DGCA च्या अहवालावर राष्ट्रवादीच्या आमदाराची संतप्त प्रतिक्रिया
ताज्या बातम्या

“रिपोर्ट दारू पिऊन बनवला…”, DGCA च्या अहवालावर राष्ट्रवादीच्या आमदाराची संतप्त प्रतिक्रिया

ajit pawar 1

Amol Mitkari On Ajit Pawar Plane Crash | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाताबाबत दिवसेंदिवस संशयाचं जाळं निर्माण होताना दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत काही पुरावे सादर केले होते. तर आज (2 मार्च) अजित पवारांचे पुत्र जय पवार (Jay Pawar) यांनी अजित पवारांच्या विमानातील एक धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – युद्धाचा फटका! दुबईत अडकला महाराष्ट्रातील बडा नेता; फ्लाइट्स रद्द, परतीचा मार्ग झाला बंद

जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओत VSR चा मालक रोहित सिंह (Rohit Singh) हा पायलटच्या मुख्य सीटवर बसून झोपलेला दिसत आहे. या व्हिडिओवरून आमदार अमोल मिटकरी (Amol Mitakri) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अमोल मिटकरी यांनी आक्रमक होत म्हटलं आहे की, DGCA चा 22 पानी प्राथमिक अहवाल हा अत्यंत सदोष आहे. या अहवाल दिलेल्या ठिकाणांच्या उल्लेखात विसंगती असल्याचं मिटकरींनी स्पष्ट केलं. तसेच DGCA चा हा अहवाल गांजा किंवा दारू पिऊन बनवला असल्याचा दिसतोय. या रिपोर्टला काहीही अर्थ नाही, असंही ते म्हणाले.

रोहित सिंह उड्डाणादरम्यान झोप घेत होता, यावरून प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. रोहित सिंह हा माजोरडा असेल तर त्याला तात्काळ अटक करावी. सोबतच VSR कंपनीवर बंदी घालावी, अशी मागणीही मिटकरींनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts