Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • निकालानंतर पीएम मोदी निवृत्ती घेणार? राहुल गांधींचंही भविष्य ठरणार!
Top News

निकालानंतर पीएम मोदी निवृत्ती घेणार? राहुल गांधींचंही भविष्य ठरणार!

Modi retirement after results

Modi retirement after results : देशात सध्या आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्याच्या विधानसभा निवडणुका होत आहे.. या राज्यांचा निकाल 4 मे रोजी म्हणजेच उद्या लागणार आहे… या निकालानंतर राहुल गांधी, ममता बॅनर्जी, हिमंत बिस्वा सरमा आणि पीएम मोदी याचं राजकीय भविष्य ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे.. या निकालानंतर पीएम नरेंद्र मोदी निवृत्ती घेतील अशीही चर्चा होत आहे… पण नरेंद्र मोदी निवृत्ती घेणार अशा चर्चा सध्या का सुरु झाल्या आहेत…

तर पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे… या ठिकाणी ममता दीदी गड राखणार की भाजप सता स्थापन करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.. जर ममता दीदींनी आपला गड राखला तर भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.. कारण पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरुन मोठा वाद पाहायला मिळत आहे… पश्चिम बंगालमधील SIRचा मुद्दा देखील चांगलाच तापला होता..  SIR प्रक्रियेत 90 लाख मतदारांना वगळ्यात आले आहे.. दोन दिवसापूर्वी ममता बॅनर्जी यांनी मुसळधार पावसात एव्हीएमच्या स्ट्राँग रुममध्ये जाऊन पाहणी केली होती… यावेळी देखील मोठा वाद पहायला मिळाला होता..

हेही वाचा – पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का? TMC च्या अंतर्गत सर्व्हेने बदलले चित्र, नेमकं काय घडलं…

बंगालची सत्ता गेल्यास ममतांची अवस्था केजरीवालांसारखी होणार

पश्चिम बंगालचा निकाल काय लागणार यावर ममता बॅनर्जी यांचं राजकीय भविष्य ठरणार आहे.. जर पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी यांच्या हातातून गेला तर बॅनर्जी यांचं देखील अरविंद केजरीवाल यांच्या सारखं होण्याची शक्यता आहे… केजरीवाल यांच्याकडे सध्या तरी पंजाब राज्य आहे… मात्र २०११ पासून सलग मुख्यमंत्री पदावर असलेल्या ममता दीदींना आपली एवढ्या वर्षाची सत्ता गमवावी लागणार आहे..

पराभव झाला तर भाजपच्या हिंदूत्वाला तडा जाण्याची शक्यता

जर आसाममध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा पराभव झाला तर भाजपच्या हिंदूत्वाला तडा जाण्याची शक्यता आहे.. भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणारे हिमंत बिस्वा सरमा हे दिंदूत्वाचं राजकारण करताना दिसतात.. त्याच्या हिंदूत्वाच्या वक्तव्यामुळे ते देशभरात चर्चेत असतात… मात्र यावेळी हिंदूत्वाचं राजकारण करुनही भाजपचा पराभव झाला तर हा काँग्रेससाठी मोठा विजय असणार आहे… भाजपच्या देशभरातील हिंदूत्वाच्या राजकारणाला काँग्रेसचं मोठं आव्हान ठरणार आहे.. भाजपचं हिंदूत्वाचं राजकारण देशभरात चालणार का असा प्रश्न निर्माण होईल…

तामिळनाडूत पुन्हा एमके स्टॅलिन यांना सत्ता मिळण्याची शक्यता

तामिळनाडूत यावेळी वेगळचं राजकारण पाहायला मिळत आहे… तामिळनाडूच्या माध्यमातून भाजप दक्षिण भारतात आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.. तर अभिनेता विजयने आपला एक स्वतंत्र पक्ष स्थापन करुन तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवत आहे.. त्यामूळे आता तामिळनाडूत आघाडी सरकार येण्याची शक्यता आहे.. तर अनेक एक्झिट पोलमध्ये तामिळनाडूत पुन्हा एमके स्टॅलिन यांना सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवत आहे..

‘…तर हा भाजपसाठी आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का असेल’

केरळमध्ये काँग्रेसप्रणित UDF पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.. केरळमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बसला तर हा काँग्रेससाठी मोठा विजय असणार आहे.. जर केरळ, आसाम या राज्यात काँग्रेसची सत्ता आणि तामिळनाडूत एमके स्टॅलिन, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता आली तर हा भाजपसाठी आतापर्यंतचा हा सर्वात मोठा धक्का असेल..

सर्व राज्य हातातून गेल्यावर पीएम मोदी निवृत्ती घेतील

सर्व राज्य हातातून गेल्यावर पीएम मोदी निवृत्ती घेतील अशी चर्चा आहे… मोदींना आता 75 वर्ष झाली आहे.. भाजपमध्ये 75 वर्ष झाल्यावर कोणतेही पद न देण्याचा एक नियम आहे.. ज्या नेत्यांनी ७५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना अनेकदा निवडणूक न लढवता ‘मार्गदर्शक मंडळा’मध्ये स्थान दिले जाते. उदा. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि सुमित्रा महाजन या नेत्यांना याच कारणामुळे मागील निवडणुकांमध्ये तिकिटे नाकारण्यात आली होती…

भाजपकडून एक नवीन चेहरा पंतप्रधान पदासाठी दिला जाईल

त्यामुळे पीएम मोदी निवृत्ती घेतील आणि भाजपकडून एक नवीन चेहरा पंतप्रधान पदासाठी दिला जाईल, असं म्हटलं जात आहे… अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर पीएम मोदींना अनेकदा झुकते माप घ्यावे लागले आहे.. त्यामुळे भाजप आणि आरएसएस एक नवीन पंतप्रधानपदाचा चेहरा देऊन मजबूत सरकार केंद्रात बसवले अशी चर्चा आहे..

राहुल गांधी यांचे राजकीय करिअर धोक्यात येण्याची शक्यता

जर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपने सत्ता मिळवली, केरळ काँग्रेसच्या हातातून गेला तर इंडिया आघाडीचे मुख्य चेहरा म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा राजकीय करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे.. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या हातातून राजस्थान, छत्तीसगड यासह अनेक राज्य गेली आहेत..त्यामुळे आता उद्या लागणाऱ्या निकालावर अनेक नेत्यांचं राजकीय भविष्य ठरणार आहे…

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts