Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • जय पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणावर मोठं भाष्य
Top News

जय पवार यांचे राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणावर मोठं भाष्य

Jay Pawar On NCP Marger Statement

Jay Pawar On NCP Marger Statement : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय जवळपास निश्चितच होता. फक्त अधिकृत निकालाची प्रतीक्षा होती. अपेक्षेप्रमाणेच आता निकाल लागला आहे. दरम्यान, आता या विजयानंतर सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद सादला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या आगामी वाटचालीवर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. सोबतच त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणावरही भाष्य केलं. त्यांच्या या विधानाने आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी खासदार सुनेत्रा पवार यांनीही विलिनीकरणाची चर्चा सध्या थांबलेली आहे, असे विधान केले होते.

विलिनीकर दोन्ही पक्षांचे होणे गरजेचे आहे

दिवंगत नेते अजित पवार यांच्यासाठी सर्वांनीच ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली. अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी यांना सर्वांनीच आधार दिला आहे, असे मत जय पवार यांनी व्यक्त केले. यावेळी पत्रकारांनी त्यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा आधार घेत विलिनीकरणावरही विचारलं. निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला. आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादींची वाटचाल कशी असेल? असंही त्यांना विचारण्यात आलं. यावर बोलताना, दोन्ही राष्ट्रवादीच्या वाटचालीबद्दल किंवा विलिनीकरणाबद्दल मी एकटा ठरवू शकत नाही. विलिनीकर दोन्ही पक्षांचे होणे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विलिनीकरणाबाबत काही ठरवलं किंवा तशी चर्चा केली, तर त्यावेळी चित्र वेगळे असू शकते, असे सूचक विधान जय पवार यांनी केले.

बारामती येथे आम्ही जनता दरबार घेणार

तसेच, यावेळी त्यांनी दर गुरुवारी बारामती येथे आम्ही जनता दरबार घेणार आहोत, असे जय पावर म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्या विजयानंतर त्यांनी सर्व बारामतीकरांचे आभार मानले. तसेच आगामी काळात बारामतीच्या लोकांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नरत राहू असेही जय पवार म्हणाले. दरम्यान, बारामती या मतदारसंघासोबतच राहुरी या विधानसभा मतदारसंघासाठीही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या मतदारसंघातून अक्षय कर्डिले यांचा विजय झाला आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts