Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल, राजकीय आव्हाने आणि समिकरणे जमणार?
Top News

सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल, राजकीय आव्हाने आणि समिकरणे जमणार?

Baramati and Rahuri By poll Election Result

Baramati and Rahuri By poll Election Result : सध्या संपूर्ण देशात निवडणुकांचे वातावरण आपल्याला पाहायला मिळते. चार राज्ये आणि 1 केंद्रशासित (5 State Election Result) प्रदेशात विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून संपूर्ण देशाच त्याकडे लक्ष आहे. मात्र, राज्यातील लोकांचा कल हा राहुरी व बारामती विधानसभा या दोन्ही मतदारसंघाच्या (Baramati and Rahuri By poll Election Result) पोटनिवडणुकांच्या निकालकडं लागलाय. या दोन्ही पोटनिवडणुकांचा निकाल हा राज्यातील राजकीय समीकरणांसाठी (Maharashtra Politics) अत्यंत महत्वाचा आहे. महाविकास आघाडी आणि महायुती (Mahayuti and Mahavikas Aaghadi) या दोन्ही आघाड्यांची प्रतिष्ठेची लढत म्हणून या निवडणुकांकडे पहिले आहे.

बारामती मतदारसंघावर पवार कुटुंबाचे वर्चस्व

बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार या प्रचंड बहुमतांनी आघाडीवर असल्याचे दिसून येते. सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच त्यांना मोठे मताधिक्य मिळताना दिसत असून समर्थकांकडून जल्लोष सुरु झाला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळॆ बारामती मतदार संघाची जागा रिक्त झाली होती त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत राज्यातील कुठल्याही मोठ्या पक्षाने संगनमताने उमेदवार उभा केला नव्हता. यामुळे निकालाचे पारडे संपूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्याकडे झुकलेले दिसते. बारामती मतदारसंघात जो पवार कुटुंबीयांचा प्रभाव आहे तो यावेळी कायम राहत असलेला आपल्याला दिसून येतो.

सुनेत्रा पवार यांच्यासमोरील आव्हाने भाजप वागणूक

मात्र यासोबतच अनेक प्रश्नांना देखील याठिकाणी उधाण येते. जसे कि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अकाली निधनाने जी पोकळी राज्याचा राजकारणात निर्माण झाली आहे ती पोकळी सुनेत्रा पवार यांना भरून काढता येईल का? आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे व चोख कामामुळे जी लोकप्रियता अजितदादांकडे होती ती लोकप्रियता सुनेत्राताईंना मिळेल का? जो मान मंत्रिमंडळाद्वारे अजितदादांना मिळायचा तो सुनेत्राताईंना मिळेल का? तसेच आता विजयनानंतर भाजपची सुनेत्राताईंकडे बघण्याची भूमिका काय असणार? त्यासोबतच आता दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय. कार्यकर्त्यांची मोटबांधणी, पक्षसंघटना, सत्ताकारण आणि राजकारण ही सर्व समीकरणे सुनेत्रा पवारांना जुळवता येतील का? यांसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत्या काळात मिळणार आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts