Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

मुंबई इंडियन्स साठी आजचा सामना म्हणजे ‘करो या मरो’

MI Vs IPL Match LSG

MI Vs IPL Match LSG  : यंदाचे आयपील चे वर्ष हे अत्यंत जोरदार व थरारक पद्धतीचे होत आहे. ज्या संघानी एकेकाळी आयपीएल आपल्या दमदार खेळीने गाजवले तेच संघ यावर्षी भरपूर निराशाजनक खेळी करताना दिसत आहेत. याच आयपीएल गाजवणाऱ्या प्रमुख संघांपैकी एक महत्वाचा संघ मुंबई इंडियन्स जो आपल्या दमदार खेळी साठी व लोकप्रियतेसाठी प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या आत्तापर्यंतच्या संपूर्ण इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्स (MI) संघाचे यंदाचे वर्ष अतिशय वाईट होत असल्याचे आपल्याला दिसतंय. पाच वेळेस आयपीएलचा खिताब आपल्या नावावर करणाऱ्या या संघाच्या पदरात यावर्षी एकूण नऊ सामन्यांपैकी दोनच विजय पडलेत. त्यामुळे यावर्षीचे आपले आव्हान संपुष्टात न येण्यासाठी येणारे सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.

आजचा सामना निर्णायक (DO OR DIE)

याच मुंबई इंडियन्स आजचा लखनौ सुपर जायंट संघाविरुद्ध होणारा आजचा वानखेडे स्टेडियम वरचा सामना अतिशय निर्णायक ठरणार आहे. आजचा सामना जर जिंकला तरच मुंबई इंडियन्स संघाचे यावर्षीचे आव्हान टिकून राहण्याची शक्यता आहे. म्हणून मुंबई इंडियन्स संघांसाठी ‘करो या मरो’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर लखनौ सुपर जायंट हा संघ आधीच आयपीएलचा यावर्षातला बाहेर पडलेला पहिला संघ बनला आहे. लखनौ सुपर जायंट या संघाने आत्तापर्यंत आठ सामन्यांपैकी दोनच सामने जिंकलेत. त्यामुळे आपले शेवटचे काही सामने ते जिंकू शकतील का हे आता बघायचंय. पॉईंट्स टेबलवर हे दोन्ही संघ अनुक्रमे मुंबई इंडियन्स नऊ तर लखनौ सुपर जायंट १० या क्रमांकावर आहेत.

रोहित शर्मा खेळणार का?

रोहित शर्मा जो कि भारतातला व मुंबई इंडियन्स संघासाठीचा अत्यंत महत्वाचा मानला जाणारा खेळाडू काही दिवसांपूर्वी गंभीर जखमी झाला आहे. तर रोहित शर्मा आज तरी आपल्या संघाला वाचविण्यासाठी खेळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आपल्या कमबॅक साठी ओळखला जाणारा मुंबई इंडियन्स संघ आपले आव्हान टिकून ठेवतो का निराशाजनक कामगिरीने बाहेर पडतो यासाठी आता सर्व आयपीएल चाहते उत्सुक आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts