Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात धोनी-रोहित खेळणार! आज होणार सर्वात मोठा सामना
क्रीडा

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्यात धोनी-रोहित खेळणार! आज होणार सर्वात मोठा सामना

10 ट्रॉफी जिंकणारे संघ एकमेकांविरुद्ध भिडणार; आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य

मुंबई MI vs CSK Match : एमएस धोनी या वर्षीच्या आयपीएलमध्ये अद्याप एकही सामना खेळलेला नाही. तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी मागील दोन सामने खेळलेला नाही. आज एक मोठा आणि महत्त्वाचा आयपीएल सामना खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात धोनी आणि रोहित दोघंही उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे, मात्र अंतिम निर्णय आज संध्याकाळी नाणेफेकीच्या अगदी आधी घेतला जाईल.

हेही वाचा :  योग्य विधींसह बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले; 25 क्विंटल फुलांनी सजवण्यात

धोनीनं अद्याप एकही सामना खेळलेला नाही :

आतापर्यंत 32 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. चेन्नई सुपर किंग्सनं सहा सामने खेळले असले तरी, संघाचा स्टार खेळाडू, एमएस धोनी, अद्याप दिसलेला नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून, धोनी आज पुनरागमन करु शकतो. याचं कारण म्हणजे धोनीने सीएसकेच्या सराव सत्रांमध्ये फलंदाजी आणि यष्टीरक्षण केलं. या हंगामापूर्वी धोनीनं नेट्समध्ये इतका वेळ कधीही घालवला नव्हता. यावरुन असं सूचित होतं की धोनी स्वतः शक्य तितक्या लवकर मैदानावर परतण्याची तयारी करत आहे. मात्र, त्याचं पुनरागमन सामन्यापूर्वी धोनीच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असेल.

मुंबई इंडियन्सचा संघ रोहितशिवाय अपूर्ण :

रोहित शर्माबद्दल बोलायचं झाल्यास, तो देखील दोन सामने खेळू शकलेला नाही. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती, ज्यातून तो आता सावरत असल्याचं दिसतं. मुंबईनं पाच आयपीएल विजेतेपदं जिंकली असली तरी, यावर्षी संघाची कामगिरी विशेष चांगली झालेली नाही. त्यामुळं, रोहितचं मैदानावर पुनरागमन अत्यावश्यक मानलं जात आहे. मात्र, संघ रोहितच्या बाबतीत कोणताही धोका पत्करु इच्छित नाही; तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत खेळणार नाही. जर रोहित आणि धोनी दोघंही परतले, तर आजच्या सामन्यातील उत्कंठा शिगेला पोहोचेल.

सामन्यासाठी दोन्ही संघ :

  • मुंबई इंडियन्स : रॉबिन मिंज, नमन धीर, शेरफेन रदरफोर्ड, रयान रिकेलटन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), राज बावा, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, मिशेल सँटनर, तिलक वर्मा, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, जसप्रित बुमराह, दीपक चाहर, मयंक मारकंडे, शार्दुल ठाकुर, क्विंटन डी कॉक, एएम गजनफर, रघु शर्मा, मयंक रावत, दानिश मालेवार, अथर्व अंकोलेकर, मोहम्मद सलाउद्दीन इजहार.
  • चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अंशुल कंबोज, गुरजापनीत सिंह, एमएस धोनी, मुकेश चौधरी, रामकृष्ण घोष, संजू सॅमसन, शिवम दुबे, श्रेयस गोपाल, खलील अहमद, आयुष म्हात्रे, उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, राहुल चाहर, सरफराज खान, अमन खान.
img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts