• Home
  • राजकारण
  • भाजपच्या विजयानंतर बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा ‘तो’ व्हिडिओ होतंय व्हायरल…
Top News

भाजपच्या विजयानंतर बंगालमध्ये पंतप्रधान मोदींचा ‘तो’ व्हिडिओ होतंय व्हायरल…

PM Modi Viral Video

PM Modi Viral Video : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. हा व्हिडिओ बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयानंतरचा असल्याचे म्हटले जाते, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालबद्दल एक महत्त्वाचे विधान केलं होतं. “गंगा बिहारमधून वाहते आणि बंगालला मिळते. बिहारने बंगालमधील भाजपच्या विजयाचा मार्गही मोकळा केला आहे,” असं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी म्हणताना दिसत आहेत.

हेही वाचा – सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल, राजकीय आव्हाने आणि समिकरणे जमणार?

बंगालमध्ये आत्मविश्वास वाढला

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याने पश्चिम बंगालमधील भाजपच्या पक्ष बांधणीत आणि कार्यकत्यांमध्ये एक सकारात्मक संदेश गेला. बिहारमधील निवडणुकीतील यशानंतर, भाजपने पश्चिम बंगालमध्ये आपली संघटना वेगाने संघटित केली आणि एक अथक प्रचार मोहीम सुरू केली, ज्याचा परिणाम आता निकालांमध्ये दिसून येत आहे.

भाजप बंगालच्या सत्तेत

पश्चिम बंगाल २०२६ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता हाती आले आहेत. कलांनुसार भाजपने लक्षणीय आघाडी घेतली असून टीएमसीची धोबीपछाड झाल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजपला जवळपास १९० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे, टीएमसीची आघाडी १०० पेक्षा कमी जागांपर्यंत कमी होताना दिसत आहे. नेटकरी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत आणि याला पंतप्रधान मोदींचे “भविष्य” म्हणत आहेत.

भाजप जवळपास ४५ टक्के मते

मतदानाच्या टक्केवारीनुसार, भाजप जवळपास ४५ टक्के मते मिळताना दिसत आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरील ट्रेंडनुसार, भाजपला ४४.९४ टक्के, तर टीएमसीला ४१.५८ टक्के मते मिळाली आहेत. सीपीआयएम ४.२० टक्के मतांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts