Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • राजा रवी वर्मांना करण जोहर द्वारे अनोखी मानवंदना
मनोरंजन

राजा रवी वर्मांना करण जोहर द्वारे अनोखी मानवंदना

मेट गाला २०२६ (Met Gala2026)

मेट गाला २०२६ (Met Gala2026) : फॅशन विश्वातील सर्वात मोठा सण म्हणजे मेट गाला . यंदाच्या मेट गाला २०२६ च्या इव्हेंटला जगभरातील अनेक नामवंत कलाकारांनी उपस्थिती दर्शविली. मुख्य म्हणजे यावर्षी भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध निर्माता करण जोहर याने मेट गाला २०२६ मध्ये पदार्पण केले. यावेळी करण जोहरने डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेला आउटफिट परिधान केला होता, जो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यंदाची मेट गालामध्ये ‘फॅशन आर्ट’ ही थीम ठेवली होती. या थीमला अनुसरून करण जोहरने राजा रवी वर्मा यांच्या चित्रांपासून प्रेरित असलेला पोशाख परिधान केला, जो अत्यंत लक्षवेधी ठरला.

राजा रवि वर्मा यांच्या काही अत्यंत प्रसिद्ध चित्रांचा समावेश

हा पोशाख हाताने केलेले पेंटिंग, थ्री-डी स्कल्प्टिंग, क्विल्टिंग तंत्रज्ञान आणि अतिशय बारीक पारंपारिक भरतकामाने तयार करण्यात आला होता. (Karan Johar)
या पोशाखात राजा रवि वर्मा यांच्या काही अत्यंत प्रसिद्ध चित्रांचा समावेश करण्यात आला होता, ज्यामध्ये ‘हंस दमयंती’, ‘कादंबरी’ आणि ‘अर्जुन-सुभद्रा’ यांचा समावेश आहे. त्याचा या पोशाखाला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. करणने हा खास लूक निवडण्यामागचे कारणही स्पष्ट केले. करणने इंस्टाग्रामवर लिहिले की, “राजा रवि वर्मा यांची कला मला नेहमीच प्रेरणा देत आली आहे, कारण त्यांची चित्रे थेट भावनांचे दर्शन घडवतात आणि एक चित्रपट निर्माता म्हणून मी देखील सिनेमात हेच करण्याचा प्रयत्न करतो.” त्यासोबतच ह्या पोषाखासाठी त्याने मनीष मल्होत्राचे कौतुक देखील केले आहे.

मनीष मल्होत्राचे कौतुक

करणने मनीषचे विशेष कौतुक करताना म्हटले की, भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर सादर करण्याची जी कला मनीषकडे आहे ती कमाल आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला ग्लोबल स्तरावर हाय एँड फॅशनसह घेऊन जाणं ही एक कलाच आहे. या कलेसाठी मला एका कॅनव्हास असल्याचं दर्शवलंत त्यासाठी खूप आभार”

राजा रवी वर्मा यांची माहिती

राजा रवि वर्मा यांची खासियत म्हणजे त्यांनी हिंदू पुराणातील देवी-देवतांचे आणि महाकाव्यांतील पात्रांचे अत्यंत जिवंत आणि वास्तववादी चित्रण केले. त्यांच्या चित्रांमुळे रामायण आणि महाभारतातील व्यक्तिरेखा सर्वसामान्य लोकांच्या अधिक जवळ आल्या. त्यांच्या चित्रांमुळेच हिंदू देवी-देवतांच्या प्रतिमा घराघरात पोहोचल्या आणि एक सांस्कृतिक ओळख निर्माण झाली. ऑईल पेंटिंग आणि पाश्चात्य तंत्राचा वापर करून त्यांनी भारतीय संस्कृती कॅनव्हासवर उतरवली, जी आजही भारतीय कलेची ओळख मानली जाते. Karan Johar

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts