Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची वर्णी? सरकारचे स्पष्टीकरण
ताज्या बातम्या

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर यांची वर्णी? सरकारचे स्पष्टीकरण

Former IPS Meera Borvankar

Former IPS Meera Borvankar : नुकतीच सोशल मीडियावर राज्याचा रिक्त असलेल्या महिला आयोगाच्या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड झाल्याची माहिती व्हायरल झाली होती. मात्र,अशी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नसून माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड झाल्याची माहिती खोटी असल्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्यद्वारे जाहीर केले गेले आहे.

राज्याचा माजी महिलाआयोग प्रमुख रुपाली चाकणकर याना खरात प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून गेल्या महिनाभर राज्यातील महिलांची सुरक्षा व प्रश्नांनाबाबत महत्वाचे असलेले राज्य महिला आयोग प्रमुख हे पद रिक्त आहे. त्यामुळे या पदावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड करावी अश्या राजकीय चर्चा रंगत होत्या. त्या पार्श्वभूमीवरच माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड झाल्याची बातमी सोशल मीडिया वर व्हायरल झाली होती पण ; हि बातमी खोटी असल्याची घोषणा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र राज्याद्वारे आपल्या अधिकृत सोशल मीडियाद्वारे करण्यात आली आहे. असा कुठलाही निर्णय झालेला नसल्याचे कळवले आहे.

रोहित पवारांनी केली होती मागणी

राज्य महिला आयोग अध्यक्षपदावरून रुपाली चाकणकर पायउतार झाल्यानंतर या जागेवर एखाद्या माजी आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मीरा बोरवणकर यांच्या नावाची मागणी या पदासाठी केली होती. त्यामुळे मीरा बोरवणकर यांचे नाव चर्चेत आले.

कोण आहेत मीरा बोरवणकर?

पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये चढ्ढा कुटुंबात जन्मलेल्या मीरा बोरवणकर या पुढे आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाल्या. संपूर्ण कारकीर्दीतून त्यांनी पोलीस दलातील कार्यक्षम महिला अधिकारी हा लौकिक संपादन केला. मुंबईतील अतिशय संवेदनशील भागात उपायुक्त म्हणून प्रभावी काम केल्यानंतर त्यांना अधीक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची स्वतंत्र जबाबदारी मिळाली होती. पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले होते. अलीकडेच मॅडम कमिशनर नावाच्या त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यात अजित पवारांवरील आरोपांमुळे खळबळ उडाली होती.

राज्य महिला आयोग (Rajya Mahila Aayog) चे काम काय असते?

राज्य महिला आयोग हे महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करणारे सरकारी संस्थान आहे. त्याची मुख्य कामे अशी आहेत:

1. महिलांच्या तक्रारींचे निवारण
महिलांवर होणारे अत्याचार, छळ, कौटुंबिक हिंसा, हुंडाबळी, लैंगिक छळ यांसारख्या प्रकरणांची चौकशी करून त्यावर कारवाई करण्यासाठी मदत करते.
2. कायदेशीर मदत व सल्ला
पीडित महिलांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन व सल्ला देते.
3. महिलांच्या हक्कांचे संरक्षण
महिलांचे संविधानिक व कायदेशीर हक्क अबाधित राहावेत यासाठी काम करते.
4. सरकारला सूचना देणे
महिलांच्या कल्याणासाठी नवीन कायदे किंवा सुधारणा सुचवते.
5. जनजागृती कार्यक्रम
महिलांमध्ये त्यांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबवते.
6. तपास व अहवाल
महिलांशी संबंधित घटनांची चौकशी करून सरकारला अहवाल सादर करते.
7. पुनर्वसन व मदत
अत्याचारग्रस्त महिलांना पुनर्वसन, समुपदेशन आणि सहाय्य उपलब्ध करून देते.
जर तुला हवे असेल तर मी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाशी संपर्क कसा साधायचा किंवा तक्रार कशी करायची हेही सांगू शकतो.

सध्या राज्यात महिलांवरील अत्याचार व गुन्हेगारी यांचे प्रमाण भरपूर वाढले आहे. त्यामुळे राज्य महिला आयोग या महत्वपूर्ण पदावर सरकार कोणाची नियुक्ती करते व त्यासोबत हि गुन्हेगारी रोखण्यासाठी सरकार काय निर्णय घेते? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts