Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • पश्चिम बंगलामध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय; थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन, म्हणाले…
ताज्या बातम्या

पश्चिम बंगलामध्ये भाजपाचा ऐतिहासिक विजय; थेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प केलं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन, म्हणाले…

Trump White House firing Iran

नवी दिल्ली Donald Trump Congratulates : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या ऐतिहासिक विजयाचे पडसाद अमेरिकेतील व्हाईट हाऊसपर्यंत उमटले आहेत. या विजयावर आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियाही येत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. आपल्या संदेशात, ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा करत म्हटलं की, हा विजय जनतेचा विश्वास आणि मजबूत नेतृत्वाचं प्रतीक आहे. त्यांनी भारताच्या लोकशाही प्रक्रियेचीही प्रशंसा केली.

हेही वाचा : ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी राजीनामा देणार नाही; असं झाल्यास काय

देशाच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा :

बंगालमधील भाजपाचा हा प्रचंड विजय देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या निकालाचा भविष्यात राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी भाजपाच्या प्रचंड विजयाबद्दल बंगालच्या जनतेचे आभार मानले आहेत आणि त्यांना विकासाच्या नव्या युगाचं आश्वासन दिलं आहे. पंतप्रधान मोदींना सुरुवातीपासूनच बंगालमधील भाजपच्या विजयाचा विश्वास होता.

आसाम आणि बंगालमध्ये भाजपाचा दणदणीत विजय :

आसाम आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं दणदणीत विजय मिळवला आहे. आसाममध्ये एनडीएनं 102 जागा जिंकल्या, तर भाजपानं 82 जागा जिंकल्या. आसाममधील भाजपा सरकारनं हॅट-ट्रिक साधली असून, हिमंता बिस्वा सरमा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपानं इतिहास रचला आहे. पश्चिम बंगालमधील 294 पैकी 207 जागांवर भाजपानं कब्जा केला आहे. बंगालमधील भाजपाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या निवडणुकीत भाजपाचा मतांचा वाटा 45 टक्क्यांपेक्षा जास्त होता.

ममता बॅनर्जी 15,000 पेक्षा जास्त मतांनी पराभूत :

ममता बॅनर्जी भवानीपूरच्या जागेवर पराभूत झाल्या. भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांना एकूण 73,463 मतं मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना एकूण 58,349 मतं मिळाली. याचा अर्थ ममता बॅनर्जी या जागेवर एकूण 15,114 मतांनी पराभूत झाल्या. मागील निवडणुकीत बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी भवानीपूर पोटनिवडणूक लढवून विधानसभेत प्रवेश केला होता.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts