Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बंगाल हादरले सुवेंदू अधीकारी यांच्या पीए ची हत्या: अभिषेक शर्मावर संशय
Top News

बंगाल हादरले सुवेंदू अधीकारी यांच्या पीए ची हत्या: अभिषेक शर्मावर संशय

Suvendu Adhikari PA Shot Dead :

 

Suvendu Adhikari PA Shot Dead : पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर भरपूर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. अश्यातच पश्चिम बंगालचे मोठे नेते व मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सुवेंदू अधीकारी यांचे वयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना काल रात्री घडली. काल रात्री ६ मे २०२६ रोजी एका अज्ञात हल्लखोराने चंद्रनाथ रथ यांच्या गाडीचा पाठलाग करत सलग गोळीबार केला. उत्तर २४ परगना जिल्ह्यातील मध्यमग्राममधील दोहरिया परिसरात ही घटना घडली. यात चंद्रनाथ रथ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांच्यासोबतच्या दुसऱ्या एका व्यक्तीला नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पाश्चुईम बंगालसह संपूर्ण देशभरात खळबळ उडालेली आहे.

अभिषेक बॅनर्जीवर संशयाची टांगती तलवार

सुवेंदू अधीकारी यांचे वयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांच्या हत्येननंतर पश्चिम बंगाल यथे राजकीय वातावरण तापले असून तणाव निर्माण झाला आहे. या हत्येनंतर भाजपचे खासदार राहुल सिन्हा यांनी एक वक्तव्य केले. राहुल सिन्हा म्हणाले, “हि हत्या ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी याने घडवून आणली असून सत्तेत नसलो तरी आम्ही तुमच्यावर भारी आहोत असे टीएमसी (TMC ) ला सिद्ध करायचे आहे.” याचे लवकरच उत्तर मिळेल असे देखील राहुल सिन्हा म्हणले आहेत.

पोलिस काय म्हणाले?

राज्याचे पोलीस महासंचालक (DGP) सिद्धनाथ गुप्ता यांनी सांगितले की, “आम्ही तपास सुरू केला असून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे. या गाडीची नंबर प्लेट बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून रिकामी काडतुसे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.”

आधीच ममता बॅनर्जी यांचा राजीनामा न देण्यावरून वाद आणि आता सुवेंदू अधीकारी यांचे वयक्तिक सहाय्यक (पीए) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या या सर्व घटनांनंतर बंगालमध्ये आणखी काय काय होईल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts