Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • टीएमसीला बंगालच्या मुलींनी आमदार-खासदार व्हावे असं वाटत नाही, कारण…, पंतप्रधान मोदींचे गंभीर आरोप
Top News

टीएमसीला बंगालच्या मुलींनी आमदार-खासदार व्हावे असं वाटत नाही, कारण…, पंतप्रधान मोदींचे गंभीर आरोप

PM Narendra Modi On TMC | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालमधील (West Bengal) बांकुरा जिल्ह्यातील विष्णुपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी तृणमूल काँग्रेसवरील निशाणा साधला.बंगालच्या मुलींनी आमदार-खासदार व्हावे असं तृणमूल काँग्रेसला वाटत नाही, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा – कोणीतरी येणार येणार गं…, रणवीर-दीपिका पुन्हा होणार आई-बाबा; लेकीने दिली हटके अंदाजात गुड न्यूज

पंतप्रधान मोदींनी नेमके काय केले आरोप?

सभेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपली प्रत्येक सभा ही मागच्या सभेपेक्षा मोठी होत आहे. मला सांगण्यात आलं की लोक या सभेसाठी 2-3 तास ​​बसले आहेत. हे वातावरण, हे प्रेम, हा उत्साह, हा जोश, हे आंदोलन त्या क्रूर सरकारविरोधातील संतापाचे प्रतीक आहे. भाजप सक्षमीकरण आणि सुरक्षेसाठी ओळखला जातो. म्हणूनच देशातील प्रत्येक राज्यातील भगिनी आणि मुली भाजपला सर्वाधिक आशीर्वाद देतात, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

ममता बॅनर्जी सरकारवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बंगालच्या मुलींनी आमदार आणि खासदार व्हावे, असं टीएमसीला वाटत नाही. बंगालच्या महिलांना 33% आरक्षण 2019 पासून लागू व्हावं असं वाटत होतं. भाजपने त्यासाठी प्रयत्नही केले. पण तृणमूल काँग्रेसला बंगालच्या मुली आमदार आणि खासदार व्हाव्यात असं वाटत नव्हतं, कारण बंगालच्या मुली त्यांच्या ‘महा जंगलराज’ला आव्हान देत होत्या. त्यामुळे, तृणमूल काँग्रेसने काँग्रेससोबत कट रचून महिलांना 33% आरक्षण देणारा कायदा मंजूर होऊ दिला नाही”, असे गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी केले आहेत.

विकसित भारताच्या उभारणीत मुलींची भूमिका अधिक व्यापक करणे आणि अधिकाधिक मुलींना राजकारणात येण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे आमचे उद्दिष्ट आहे. संसदेत काय घडले ते तुम्ही पाहिले आहे. टीएमसीने पुन्हा एकदा बंगालच्या भगिनींचा विश्वासघात केला आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

भगिनींची सुरक्षा, माता-भगिनींचा सन्मान आणि तुमची समृद्धी ही भाजपची प्राथमिकता आहे. आजही टीएमसी सरकारच्या भ्रष्टाचारामुळे बंगालमधील महिलांना ते लाभ मिळत नाहीत, जे त्यांना भाजप सरकारच्या काळात मिळाले असते. बंगालमध्ये भाजपचे सरकार स्थापन झाल्यास गरीब महिलांना मोफत रेशन मिळेल आणि कोणीही तुमचे रेशन चोरू शकणार नाही, असे आश्वासनही पंतप्रधान मोदींनी दिले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts