Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • निदा खानला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Top News

निदा खानला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?

Nida Khan police custody

Nida Khan police custody : टीसीएस प्रकरणातील सध्या खुप मोठं-मोठ्या घडामोडी समोर येताना दिसत आहेत. आरोपी निदा खानच्या आज छत्रपती संभाजीनगर येथून मूसक्या आवळल्या. त्यानंतर आज लगेच तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी कोर्टात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.

गेले 25 दिवस निदा खान पोलिसांना गुंगारा देऊन लपली होती. कोर्टाने तिचा जामीन नाकारल्यानंतर अखेर पोलिसांनी तिला शोधून काढले. तिच्यासोबत पाच जणांनाही अटक करण्यात आली आहे. आज पोलिसांच्या मोठ्या सुरक्षततेत निदा खानला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

टीसीएस (TCS) प्रकरण उघड झाल्यानंतर निदा खानने नाशिक न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, परंतु न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला होता. गर्भवती असल्याचं कारण देत तिने पुन्हा एकदा जमिनासाठी प्रयत्न केला होता, मात्र तिला अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर तिला आता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

चार आरोपींना पोलिसांची आधीच अटक

या प्रकरणातील चार आरोपी रजा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसैन शौकत कुरेशी यांना पोलिसांनी आधीच अटक केली होती. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात आहेत. परंतु या प्रकरणाची मास्टरमाईंड असलेली निदा खान मात्र फरार झाली होती. ती अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर तिला आता छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts