Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • निदा खानला आसरा देणाऱ्या, मतीनचा अश्लील व्हिडीओ समोर
Top News

निदा खानला आसरा देणाऱ्या, मतीनचा अश्लील व्हिडीओ समोर

Matin Obscene Video Nida Khan

Matin Obscene Video Nida Khan : नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात रोज नवेनवे खुलासे समोर येतायत. आता या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागलंय. काल या कंपनीतली आरोपी HR निदा खानला अटक झाली आणि आज तिला लपवणारा मतीन पटेल याला ही पोलीसांनी ताब्यात घेतलंय. निदा सारखेच किंबहुना त्याच्याहूनही भयंकर असे या मतीनचे कारनामे आता समोर आलेत. मतीननं सुद्धा लव्ह जिहाद करत अनेक तरूणींचे अश्लील व्हिडीओ बनवले आहेत. काय आहे हे संपुर्ण प्रकरण, निदा खानला कसं लपवलं या मतीन पटेलनं, कोण आहे हा पटेल आणि त्यानं बनवलेल्या अश्लील व्हिडीओंमागचं सत्य या लेखातून पाहू…

मतीन पटेलच्याही पोलीसांनी मुसक्या आवळल्या

नाशिक टीसीएस कंपनीच्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये काल नाशिक पोलीसांनी अटक केली. निदा खान नारेगावच्या कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये आई-वडील भाऊ आणि मावशीसह राहत होती. तिला अटक करण्याच्या दोन दिवसांपासून पोलीस ती राहत असलेल्या फ्लॅटवर नजर ठेवून होते आणि संधी मिळताच तिला बेड्या ठोकण्यात आल्या. पण काल तिला पकडल्यानंतर आज तिला लपवणारा मतीन पटेलच्याही पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

आश्रय दिल्याप्रकरण पटेलवर गुन्हा

मतीन पटेल हा MIM चा नगरसेवक आहे. त्याचा एक अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. एका मुलीशी अश्लील वर्तन करून तो व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं दिसून येतंय. पटेलनं अशाच प्रकारे अनेक मुलींचे अश्लील व्हिडीओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याची सूत्रांची माहिती आहे. अनेक महिलांसोबत त्यानं अश्लील वर्तन केल्याचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्याचं समजतं. सध्या मतीन पटेल ह्याला पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याला या प्रकरणात निदा खानसह सहआरोपी करण्यात आलं आहे. गुन्हेगारांना आश्रय दिल्याप्रकरणी बीएनएस कलम 249 अंतर्गत पटेलवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. त्यानं केलेल्या अश्लील व्हिडीओंचा आता पोलीस तपास करत आहेत. त्याच्यावर लव्ह-जिहाद केल्याचाही आरोप आहे.

मतीन पटेल याचा मोबाईल देखील जप्त

आरोपी निदा खान हिला त्यानं 42 दिवस लपून ठेवल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. मतीन पटेल याचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला असून त्याच्या मोबाईल डेटामधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवलीय. नाशिकमधील आयटी कंपनी टीसीएस या प्रकरणात सुरुवात 26 मार्च रोजी झाली होती, नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील अशोका बिजनेस इनक्लेव्हमध्ये असलेल्या TCS च्या कार्यालयात काम करणाऱ्या एका 23 वर्षे तरुणीने सर्वात आधी तक्रार दिली होती, त्यानंतर दोन आणि तीन एप्रिल दरम्यान आणखी आठ एफ आय आर नोंदवले गेले. नाशिक TCS कंपनीच्या सध्या नऊ प्रकरणांची सुनावणी सध्या नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुरू आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts