Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजस्थानचा 77 धावांनी धुव्वा, गुजरात दुसऱ्या स्थानावर, क्रमवारीत उलथापालथ
Top News

राजस्थानचा 77 धावांनी धुव्वा, गुजरात दुसऱ्या स्थानावर, क्रमवारीत उलथापालथ

IPL Season 2026 GT Vs RR

IPL Season 2026 GT Vs RR :  आयपीएल हंगाम 2026 हा (IPL Season 2026 ) सध्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे अनेक संघासाठी पुढील सामने हे ‘करो या मरो’ असेच आहेत. त्यामुळं यापुढे होणाऱ्या सर्व सामन्यानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ (Standings Ranking)  पाहाला मिळणार आहे. आयपीएलचा 52 वा सामना (IPL Match 52)  गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला या मध्ये गुजरातने राजस्थानला (GT Vs RR)  पराभवाचं पाणी पाजलं. मात्र, या एका विजयामुळे अनेक संघाना वर-खाली स्थान मिळाल्याचे पाहायला मिळलं.

हेही वाचा – बंगळूरु नव्हे तर ‘या’ शहरात होणार IPL फायनल; बीसीसीआयनं केली घोषणा

या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी धुव्वा उडवला आणि टॉप 2 मध्ये जागा मिळवली आहे. पण अजूनही कोणताच संघ प्लेऑफमधील आपली जागा पक्की करू शकला नाही. तसचं सर्वच दहाही संघाना टॉप 4 मध्ये जागा मिळवण्याची संधी आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या विजयानंतर 14 गुण खात्यात जमा झाले असून पाचव्या स्थानावरून थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर राजस्थान रॉयल्सची घसरण झाली असून चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेला आहे. यामुळे प्लेऑफची रंगत आणखी वाढणार असं दिसत आहे.

गुणतालिकेतील संघाचे संध्याचे स्थान..

आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाने 11 पैकी 7 सामन्यात विजय मिळवून 14 गुण आणि +0.737 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. दुसऱ्या स्थानावर 14 गुण आणि +0.228 नेट रनरेटसह गुजरात टायटन्सन पोहोचला आहे. पंजाब किंग्स संघ 13 गुण आणि +0.571 नेट रनरेटसही तिसऱ्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 12 गुण आणि +1.234 नेट रनरेटसह चौथं स्थान आहे. राजस्थान रॉयल्सच्या खात्यात 12 गुण असून नेट रनरेट पराभवामुळे कमी झाला आहे. त्यामुळे पाचव्या स्थानावर आहे.

मुंबई इंडियन्स आणि चेन्नईला प्लेऑफची संधी?

चेन्नई सुपर किंग्सने 10 सामन्यापैकी 5 सामन्यात विजय आणि 5 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे खात्यात 10 गुण आणि +0.151 नेट रनरेट असून सहाव्या स्थानावर आहे. अजून चार सामने खेळायचे असून त्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी मिळेल. कोलकाता नाईट रायडर्ससाठी प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. आतापर्यंत 10 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एका सामना ड्रॉ झाल्याने एक गुण मिळाला आहे. त्यामुळे 9 गुण आणि -0.169 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. आता उर्वरित चार सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल.

दिल्ली कॅपिटल्सचे 8 गुण आणि नेट रनरेट हा -1.154 आहे. मुंबई इंडियन्सचे 6 गुण आणि नेट रनरेट हा -0.649 आहे आणि लखनौ सुपर जायंट्सचे 6 गुण आणि -0.649 नेट रनरेट आहे. या तिन्ही संघांची एक सारखी स्थिती आहे. या तिन्ही संघांचं 16 गुणांचं गणित काही सुटणार नाही. त्यामुळे उर्वरित सामन्यात विजय मिळवला तर 14 गुण होतील. त्यामुळे आता टॉपच्या संघाच्या स्थितीवर या संघांचं गणित अवलंबून आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts