• Home
  • देश
  • “जर युरेनियम साठ्यांच्या जवळ गेला तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, दिला गंभीर इशारा
Top News

“जर युरेनियम साठ्यांच्या जवळ गेला तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, दिला गंभीर इशारा

trump 6

Donald Trump On Iran | मध्यपूर्वेत अमेरिका (US) आणि इराण (Iran) या देशांमधील संघर्ष कमी होण्याची कसलीही चिन्हं दिसत नाहीयेत. या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढत चालला आहे.सध्या अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच, इराणने पाकिस्तानमार्फत अमेरिकेला शांतता प्रस्तावातील काही मुद्दे पाठवले होते, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. अशातच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठी धमकी दिली आहे.

हेही वाचा – डोळ्यांत आनंदाश्रू… थलपती विजय CM होताच त्रिशा झाली भावुक? व्हिडीओ तुफान व्हायरल

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नेमकी काय दिली धमकी?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला आणखी एक धमकी दिली आहे. जर कोणी समृद्ध युरेनियम साठ्यांच्या जवळ गेले, तर अमेरिका ते उडवून देईल, अशी थेट धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी पेटणार असल्याचं म्हटलं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, इराणच्या समृद्ध युरेनियम साठ्यांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जर युरेनियम साठ्यांच्या ठिकाणी पोहोचण्याचा कोणताही प्रयत्न झाला तर तात्काळ लष्करी कारवाई केली जाईल, अशा थेट इशारा ट्रम्प यांनी इराणला दिला आहे. युरेनियम साठ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला, तर अमेरिकन लष्कराकडे ते उडवून देण्याची शक्ती आहे, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, “इराणला लवकरच समजेल की आम्ही युरेनियम साठ्यांवर लक्ष ठेवून आहोत. मी ‘स्पेस फोर्स’ नावाची एक संघटना स्थापन केली आहे आणि ते त्यावर लक्ष ठेवून आहेत. जर कोणी त्या ठिकाणाजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला लगेच कळेल आणि आम्ही त्यांना उडवून देऊ. घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाही व्यक्तीबद्दल स्पेस फोर्स सविस्तर माहिती देऊ शकते. त्यामुशे जर कोणी आत शिरले, तर स्पेस फोर्स त्यांचे नाव, पत्ता, बॅज क्रमांक देऊ शकतात, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर इराण नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच सध्या या दोन्ही देशांमधील संघर्ष आणखी वाढत चालल्याची चिन्हं दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts