• Home
  • मनोरंजन
  • डोळ्यांत आनंदाश्रू… थलपती विजय CM होताच त्रिशा झाली भावुक? व्हिडीओ तुफान व्हायरल
Top News

डोळ्यांत आनंदाश्रू… थलपती विजय CM होताच त्रिशा झाली भावुक? व्हिडीओ तुफान व्हायरल

vijay

CM Vijay-Trisha Krishnan | तामिळनाडूमध्ये TVK पक्षाने सत्ता स्थापन करत मोठा इतिहास रचला आहे. प्रसिद्ध अभिनेता थलपती विजयच्या (Thalapathy Vijay) TVK पक्षाने विधानसभा निवडणुकीमध्ये 107 जागा जिंकत मोठा विजय मिळवला. मात्र, त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी 11 जागांची आवश्यकता होती. तर काँग्रेस, सीपीआय आणि इतर पक्षांच्या मदतीने विजयच्या TVK पक्षाने सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठला. त्यानंतर रविवारी (10 मे) थलपती विजयने (Thalapathy Vijay) मुख्यमंत्रीपदाची थपथ घेतली.

हेही वाचा – जमीन वादांना आळा? जुलैपासून नवा कायदा, राज्य सरकारने केली मोठी घोषणा

काल जोसेफ विजयने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये या शपथविधीचा भव्य सोहळा पार पडला. या भव्य सोहळ्याला विजयचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्याला अभिनेत्री त्रिशा कृष्णनेही (Trisha Krishnan) हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

थलपती विजय मुख्यमंत्री होताच काय म्हणाली त्रिशा कृष्णन?

सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्रिशासोबत माध्यमांनी संवाद साधला. यावेळी तामिळनाडूसाठी हा एक मोठा दिवस आहे, असं माध्यमांनी म्हणताच त्रिशा हसून म्हणाली की, “हो, धन्यवाद. मला खूप आनंद झाला आहे.” तसेच या सोहळ्याला त्रिशासोबत तिची आई उमा कृष्णन यांनी देखील हजेरी लावली होती.

त्रिशाने या सोहळ्यामध्ये निळ्या रंगाची साडी नेसली होती ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर त्रिशा या सोहळ्यादरम्यान खूप आनंदी दिसत होती. तसेच जेव्हा विजयने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि तो आपले पहिले भाषण देत होता, तेव्हा त्रिशा भावुक झाल्याचं पहायला मिळालं. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसत होते. तर सध्या त्रिशाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, त्रिशा आणि विजय हे प्रसिद्ध कपल्सपैकी एक आहेत. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘लिओ’, ‘आदि’, ‘कुरूवी’, ‘घिल्ली’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ते दोघे त्यांच्या कथित वैयक्तिक संबंधांमुळेही चर्चेत राहिले आहेत. फेब्रुवारीमध्ये विजयची पत्नी संगीताने एका अभिनेत्रीसोबतच्या त्याच्या कथित अफेअरचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर मार्चमध्ये विजय आणि त्रिशा चेन्नईमधील एका लग्नसमारंभात एकत्र दिसले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना जोरदार सुरूवात झाली आहे. मात्र, अद्याप या दोघांपैकी कोणीही आपल्या नात्यावर सार्वजनिकरित्या भाष्य केलेले नाहीये.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts