Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • धार्मिक
  • सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण, ‘अमृत पर्व’च्या निमित्त मोदींच्या हस्ते पूजा
Top News

सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण, ‘अमृत पर्व’च्या निमित्त मोदींच्या हस्ते पूजा

Somnath Mandir Amrut Parva

Somnath Mandir Amrut Parva : देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि देशातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या सोमनाथ सोमनाथ मंदिरात अभूतपूर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे ‘अमृत पर्व’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमनाथ मंदिराच्या भव्य कळसाला, देशभरातील 11 पवित्र तीर्थक्षेत्रांमधील पाण्याने अभिषेक करण्यात येतोय. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी उपस्थिती लावत सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत पर्व’ (Somnath Amrit Mahotsav) कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजा केली. भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराच्या भव्य कळसाला देशभरातील 11 पवित्र तीर्थक्षेत्रांतील पाण्याने अभिषेक करण्यात आला.

कार्यक्रमाची पार्श्वभूमी

देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सोमनाथ मंदिरात ८ ते ११ मे दरम्यान भव्य धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यानंतर पुनर्बांधणी करण्यात आलेल्या पहिल्या ज्योतिर्लिंग मंदिराच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त हा चार दिवसीय सोहळा साजरा केला जाणार आहे. सनातन परंपरेच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक ठरलेल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी मांडला होता. त्यानंतर उभारण्यात आलेले हे भव्य मंदिर आजही देशाच्या श्रद्धा आणि इतिहासाचे प्रतीक मानले जाते. या विशेष सोहळ्यात प्रथमच पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या शिखरावर कुंभाभिषेक करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. ज्यामध्ये ११ पवित्र तीर्थक्षेत्रांतील पाण्याने मंदिराच्या कळसावर अभिषेक करण्यात आला. धार्मिक विधी, वैदिक मंत्रोच्चार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हा ऐतिहासिक उत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला अनेक नेते, कलाकर , दिग्गज व भाविकांजी उपस्थिती लाभली .

सोमनाथ मंदिराचा इतिहास

देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या सोमनाथ मंदिराने अनेक आक्रमणे स्वतःवर झेलली आहेत. आत्तापर्यंत या मंदिरावर एकूण १७ स्वाऱ्या झाल्याचे इतिहासात नमूद केले आहे. महमूद गझनी याने सर्वप्रथम १०२६ साली या मंदिराचा विध्वंस व लूट केली होती. त्यानंतर औरंगझेबापर्यंत या मंदिराचा अनेक वेळा ह्रास करण्यात आला होता. मात्र, अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिरांची पुनर्बांधणी केली. १९४७ पर्यंत मंदिराची अत्यंत दुरावस्था झाली होती. देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनेक विरोधाला सामोरे अखेर मंदिरांची पुनर्स्थापना केली.

सोमनाथ मंदिर हे केवळ धार्मिक क्षेत्र नसून भारताच्या सांस्कृतिक अस्मिता, श्रद्धा आणि पुनर्जागरणाचे जिवंत प्रतीक मानले जाते. अनेक आक्रमणांनंतरही पुन्हा उभे राहिलेले हे मंदिर सनातन परंपरेच्या अटळ शक्तीचे आणि भारतीय आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts