Congress leader accident in Pune : महाराष्ट्राचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच नुकताच सुप्रिया सुळे (Supriya Sule’s Accident) यांच्या गाडीला अज्ञात व्यक्तीने धडक दिल्याची घटना घडली. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातच (Pune Car Accident) काँग्रेसच्य बड्या नेत्याच्या गाडीचा भीषण अपघात (Horrific Accident) झाल्याची धक्कादयाक घटना समोर आली आहे. अपघातामध्ये काँग्रेस नेते अभय छाजेड (Abhay Chhajed) यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत (Serious injury) झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हेही वाचा – पहिल्याच बैठकीत मोठे निर्णय! पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड हे रात्री साधारण नऊ साडे नऊच्या दरम्यान घडली. ते मुळशी येथून पुण्याच्या दिशेने येत होते. यावेळी पिरंगूट परिसरात चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट बाजूच्या टेकडीला जाऊन धडकली. धडक इतकी जोरात होती की, यामध्ये कारचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या छाजेड यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
अभय छाजेड हे पुण्यातील काँग्रेसचे एक ज्येष्ठ आणि सक्रिय नेते आहेत. त्यांच्या अपघाताची बातमी समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करण्यास सुरुवात केली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली असून ते पूर्णपणे बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली जात आहे. मात्र, हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे आणि कसा घडला याची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही.












