Ferrari Viral Video : महागड्या गाड्यांची आवड ही फक्त श्रीमंत लोकांपुरती मर्यादित नसते. सुपरकार्सचं आकर्षण सामान्य माणसालाही तितकंच असतं. फरक इतकाच की प्रत्येकाला अशा गाड्या खरेदी करणं शक्य होत नाही. पण कधी कधी आयुष्यात असे काही क्षण येतात, जे कायमस्वरूपी आठवण बनून राहतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ अशाच एका सुंदर क्षणामुळे चर्चेत आला आहे.
”शिवाजी भी हमारे….” काँग्रेसच्या नेत्याद्वारे वादग्रस्त वक्तव्य
रस्त्याच्या कडेला उभी असलेली लाल रंगाची आलिशान फरारी पाहून एका छोट्या मुलाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो उत्साहाने त्या गाडीसमोर उभा राहून फोटो काढत होता, तर त्याचे वडील मोबाईलमध्ये त्याचे खास क्षण कैद करत होते. त्या मुलाच्या चेहऱ्यावर सुपरकार पाहिल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.मात्र, हे सगळं त्या फरारीचा मालक काही अंतरावरून शांतपणे पाहत होता. सामान्यतः अशा वेळी लोक मुलांना गाडीपासून दूर राहण्यास सांगतात किंवा रागावतात. पण या व्यक्तीने जे केलं, त्याने संपूर्ण इंटरनेटचं मन जिंकलं. त्यांनी त्या मुलाला थेट फरारीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसवलं. एवढंच नाही, तर कार स्टार्ट करून तिचा दमदार आवाज आणि रेस देण्याचाही अनुभव त्याला दिला.
फरारीसारख्या स्वप्नातील गाडीत बसल्यानंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून अनेक नेटकरी भावुक झाले. काही क्षणांसाठी का होईना, पण त्या मुलाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं होतं. त्याच्या डोळ्यांतील चमक आणि निरागस हास्य सोशल मीडियावर सर्वांचंच मन जिंकत आहे.
हा व्हिडीओ आमिर शर्मा यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, लाखो लोकांनी तो पाहिला आहे. “खरी श्रीमंती पैशात नसते, तर मनात असते,” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत. सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असून, लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे.
View this post on Instagram












