Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • ट्रम्प यांचा चीन दौरा, कोणते निर्णय होणार? भारतासह जगाच्या नजरा…
Top News

ट्रम्प यांचा चीन दौरा, कोणते निर्णय होणार? भारतासह जगाच्या नजरा…

Trump China visit

Trump China visit : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्ण जगाला देशोधडीला लावलं. इराणवर इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत मोठा हल्ला केला. तेव्हापासूनच संपूर्ण जग तणावात आहे. इराण आणि अमेरिका युद्धाच्या झळा भारतासह संपूर्ण जग सहन करतंय. ऊर्जेचं खूप मोठं संकट आहे. परिस्थिती अधिक बिकट होत चाललीय. अनेक देशात कच्चं तेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे. थेट अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होतोय, आणि याच दरम्यान डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्यादरम्यान काय निर्णय होतात, याकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

नऊ वर्षांनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष स्वतःहून चीनच्या दौऱ्यावर आहेत. यापूर्वी २०१७ मध्ये ट्रम्प यांनी चीनचा दौरा केला होता. इराण-अमेरिका युद्ध, टॅरिफ वॉर, तैवानमधील तणाव आणि जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. ट्रम्प यांच्यासोबत या दौऱ्यात मस्क आणि कुक यांच्यासह १७ मुख्य कार्यकारी अधिकारी देखील जात आहेत. ज्यामुळे या दौऱ्याला मुत्सद्देगिरीसोबतच व्यावसायिक धोरणाचं स्वरूप प्राप्त झालंय. या दौऱ्यात जगाचं लक्ष बोइंगसोबत होणाऱ्या संभाव्य महाकरारावर आहे.

चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात

डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौऱ्याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात आहेत. इराणसोबतच्या युद्धात देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर गंभीर आरोप केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात चीन हा इराणला मदत करत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय काही दिवसांपूर्वी होर्मुज खाडीत चीनच्या मालवाहू जहाजावर मोठा हल्ला देखील करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प हे तीन दिवसीय चीन दौऱ्यावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्याकडे जगाच्या नजरा लागल्यात. काही महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे. यादरम्यानच आता चीन दौऱ्यावर निघण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धाबाबत मोठं विधान

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा तीन दिवसांचा चीन दौरा आहे. मात्र,चीन दौऱ्यावर निघण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा धक्का दिला. बीजिंगला रवाना होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या युद्धाबाबत मोठं विधान केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, त्यांना इराणसोबतचं युद्ध सोडण्याकरिता चीनची अजिबात गरज नाही. शी जिनपिंग यांची इराणसोबच्या युद्धात कोणतीही मदत घेणार नसल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं. डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा पूर्व नियोजित आहे. यादरम्यान पुन्हा एकदा इराणला चेतावणी देत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, आता इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये योग्य रस्ता निवडावा लागेल. नाही तर त्यांना अत्यंत वाईट परिणामांना सामोरं जावं लागेल. यासोबतच युक्रेन रशिया युद्ध लवकरच संपेल असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय.

चीनसोबत ते इराणबद्दल चर्चा करणार अमेरिकेची स्पष्टोक्ती

डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यात महत्वाच्या मुद्द्यात चर्चा होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्य देखील या दौऱ्यावर आहेत. मोठे अधिकारीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चीनला जात आहेत. न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, चीनसोबत ते इराणबद्दल चर्चा करणार आहेत. मात्र, हा बैठकीचा मुख्य मुद्दा नसणार आहे. त्यांचा हा दौरा केवाळ अमेरिका-चीन व्यापार संबंध सुधारण्यासाठी नाही, तर जागतिक राजकारणात पुन्हा अमेरिकेचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा हेतू असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

संघर्षामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद

१३ ते १५ मे या काळात होणाऱ्या या दौऱ्यात अनेक जागतिक पेचांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. इराणसोबतच्या संघर्षामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झालीय.. जागतिक स्तरावर इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय.. यावर तोडगा काढण्यासाठी ट्रम्प जिनपिंग यांची मदत मागू शकतात. अमेरिका आणि चीनमधील व्यापारिक तणाव कमी करण्यासाठी काही मोठे करार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीने तैवानवरील चीनची भूमिका आणि अमेरिकेचे हितसंबंध यावरही चर्चा होईल.

ट्रम्प यांनी आपला कणखर बाणा सोडलेला

एकीकडे जिनपिंग यांची स्तुती केली असली, तरी ट्रम्प यांनी आपला कणखर बाणा सोडलेला नाही. त्यांनी स्पष्ट केले की, इराणसोबतचे युद्ध संपवण्यासाठी त्यांना चीनच्या मदतीची ‘गरज’ नाही, पण जागतिक शांततेसाठी ते चर्चा करतील. “इराणला आता योग्य मार्ग निवडावा लागेल, अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या हाय-प्रोफाईल भेटीकडे भारताचंही बारीक लक्ष आहे. अमेरिका आणि चीनमधील जवळीक वाढल्यास किंवा इराण प्रश्नावर काही नवीन समीकरणं तयार झाल्यास त्याचा परिणाम भारतीय उपखंडातील राजकारणावर आणि इंधनाच्या दरांवर होऊ शकतो… त्यामुळे ट्रम्प यांच्या दौऱ्याकडे भारताचं लक्ष लागलंय.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts