ताज्या बातम्या

सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली रुग्णालयात दाखल

SONIA GANDHI HOSPITALIZED: 

SONIA GANDHI HOSPITALIZED:  राष्ट्रीय काँग्रेसच्या गोटातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी याना तातडीनें रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनामध्ये चिंतेचे सावट निर्माण झाले असून अस्वस्थता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांना तातडीने रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे. एका विशेष शस्त्रक्रियेसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्या डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली उपचार घेत आहेत. मात्र, नेमकी कोणती शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे किंवा त्यांच्या प्रकृतीबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशभरातील अनेक नेते त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण

संपूर्ण देशभरात काँग्रेसची परिस्थिती नाजूक असताना काँग्रेस पक्षाचा एक मार्गदर्शक चेहरा म्हणून सोनिया गांधींकडे पहिल्या जाते.  पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका आजही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यातच उतार प्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या निवडणूका तोंडावर असताना सोनिया गांधी यांची तब्येत बिघडणे एक गंभीर बाब आहे. या कारणामुळे देशातील संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात चिंता व काळजी वाढली आहे. या कारणामुळे देशभरातील संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी सोनिया गांधी यांची प्रकृती उत्तम राहवी यासाठी प्रार्थना करत आहेत.

याचदरम्यान शस्त्रक्रिया हि किरकोळ असून काळजी करण्याचे काही कारण नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts