Bomb Threat To CM In Punjab | पंजाबमध्ये (Punjab) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांच्या निवासस्थानाला बॉम्बची धमकी (Bomb Threat) देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पंजाबच्या भाजप मुख्यालयाला आणि काही भाजप नेत्यांना देखील बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर पंजाबमधील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून सुरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टी हादरली; नेमकं घडलं काय?
मुख्यमंत्री निवासस्थान आणि भाजप कार्यालयांना बॉम्बस्फोटाची धमकी
सध्या पंजाबमधील पोलीस संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यतेमुळे सतर्क झाले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानाला बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. तसेच पंजाब भाजपचे अध्यक्ष सुनील जाखर यांना देखील बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली असून यामध्ये पंजाब भाजप मुख्यालय आणि दिल्लीतील भाजप मुख्यालयाचाही उल्लेख करण्यात आला आहे.
पंजाबमध्ये मुख्यमंत्र्यांना, भाजप नेत्यांना धमकी आल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच पंजाबमध्ये सर्वत्र सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून कडक सुरक्षा करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील बीएसएफच्या पंजाब फ्रंटियर मुख्यालयाबाहेर आणि अमृतसरमधील खासा लष्करी छावणी परिसरात स्फोट झाले होते. यामध्ये पहिला स्फोट हा जालंधरमध्ये रात्री 8 वाजण्याच्या सुमारास झाला होता तर दुसरा स्फोट अमृतसरमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झाला होता. अशातच आता पुन्हा एकदा पंजाबमध्ये बॉम्बस्फोटाच्या धमक्या आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, यापूर्वी 27 एप्रिल रोजी पतियाळाच्या शंभू परिसरात रेल्वे रुळांवर एका मालगाडीचा स्फोट झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) समर्थित एका दहशतवादी गटाच्या चार सदस्यांना अटक केली आहे. हा गट खलिस्तान समर्थक असल्याचे मानले जात आहे.










