Vijay Thalapathy Floor Test: तामिळनाडू राज्याचा राजकारणात सध्या अनेक गोष्टी घडल्याचे दिसून येत आहे. अशातच तामिळनाडू राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री थालापथी विजय यांनी आपली पहिले राजकीय आव्हान यशस्वीपणे पार पाडले आहे. मुख्यमंत्री सी. विजय यांनी आपले बहुमत सिद्ध केले आहे.
तामिळनाडू विधानसभेत बुधवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावात TVK (Tamilaga Vettri Kazhagam) पक्षला १४४ आमदारांचा पाठिंबा मिळाला. यामध्ये TVK पक्षाचे १०७ आमदार काँग्रेसचे ५ आमदार तर सीपीआय, व्हीसीके आणि एआययूअमके या पक्षाचे दोन आमदारांनी पाठिंबा दर्शवला. महत्वाचे म्हणजे AMMK या पाकशातून हकालपट्टी झालेलेएस. कामराज यांनी सुद्धा TVK पकक्षाला पाठिंबा दिला. फ्लॉवर टेस्टच्या चाचणीदरम्यान १२० बहुमताची संख्या पोहोचली असताना एक खळबळ उडाली. AIDMK पक्षाच्या ४७ आमदारापैकी २५ आमदारांनी विजय यांच्या TVK पक्षाला मतदान देऊन सरकारच्या बाजूने कौल दिला. या घटनेनेनंतर सभागृहात चांगलेच खळबळीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
विरोधकांचा सभात्याग
या घटनेनंतर विधाभसभेत चांगलेच नाटकीय समीकरण पाहायला मिळाले. AIDMK च्या २५ आमदारांनी केलेल्या मतदानानंतर विजय यांच्या पक्षाला १४५ मते मिळाली. DMK व त्यांच्या मित्रपक्षांनी विश्वासदर्शक ठरावाला विरोध करत सभात्याग केला तर भाजपाचे एकमेव आमदार भोजराजन यांनी तटस्थ भुमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांच्या मते हे सरकार जनतेचे नसून TVK ने युतीकरून आपल्या फायद्यासाठी हे सरकार स्थापन केले आहे. तर TVK ने हे जातीभेदावर आधारित नसून जनतेचे सरकार आहे असे नमूद केले.
या घटनेमुळे तामिळनाडू राज्याचा राजकारणांत आणखी काय मोठे बदल व समीकरण पाहायला मिळतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












